CM Eknath Shinde | ‘आम्ही ज्यांना हात दाखवायचा त्यांना 30 जूनला दाखवला’ – एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी शिर्डी दौऱ्यावर असताना आपला हात एका ज्योतिषाला दाखवला होता आणि भविष्य जाणून घेतल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी असा प्रकार करुन अंधश्रद्धेला खतपाणी घातले आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ज्यांना हात दाखवायचा त्यांना 30 जूनला दाखवला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.

 

आम्ही जे काही करतो, ते उघडपणे करतो. काहीही लपून छपून करत नाही. माझ्यासोबत शिर्डी दौऱ्यात दोन मंत्री होते. तसेच पत्रकार देखील त्यावेळी तेथे उपस्थित होते. राहतो प्रश्न मी ज्योतिषाला हात दाखविण्याचा. तर माझ्याकडे आत्मविश्वास होता, म्हणून तर 50 आमदारांसोबत 13 खासदार माझ्यासोबत आले आहेत. आम्ही राज्यात नवीन सरकार स्थापन केले आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोणासोबत काम करत होते? कुणासाठी सरकार चालवत होते? हे सर्वसामान्य लोकांना मान्य नव्हते. त्यामुळे आम्ही बंड करत, सर्वसामान्यांचे सरकार स्थापन केले आहे. 30 जूनला आम्ही ज्यांना हात दाखवायचा होता त्यांना दाखवला आहे. चांगला हात दाखवला आहे. आम्ही जे काही करतो ते उघड उघड करतो. जे लपून छपून करतात त्यांची काळजी करा. त्यांना प्रश्न विचारा, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या या कथित भविष्य पाहण्याच्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली होती.
मी ज्योतिषी नाही. माझा त्यावर विश्वास नाही. त्यामुळे मी दौरा सोडून कुठेही हात दाखवत फिरत नाही.
आत्मविश्वास नसला की मग देवदर्शनासाठीचे दौरे वाढतात, असे शरद पवार म्हणाले होते.

 

Web Title :- CM Eknath Shinde | maharashtra cm eknath shinde reacts on jyotish astrology and sharad pawar allegations

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते – देवेंद्र फडणवीस

Prakash Ambedkar | राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’