CM Eknath Shinde | नंदुरबारच्या सभेत ठाकरे गटावर ‘लक्ष्य’

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज (दि. 29) नंदुरबार दौऱ्यावर आहेत. नंदुरबार जिल्ह्यात नगरपंचायतीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमानंतर सभा देखील घेतली आहे. सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे गटावर (Thackeray Group) आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला केला.

 

या सभेला शिंदे यांच्या गटातील मंत्री आणि आमदार उपस्थित होते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी देखील यावेळी भाषण केले आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले. यावेळी सत्तारांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख पप्पू म्हणून केला. बापाची औलाद असाल तर राजीनामा द्या. मी देखील राजीनामा देतो. त्यानंतर पुन्हा निवडणुका होतील. मी सिल्लोडमधून लढतो आणि तुम्ही मुंबईतून लढा. पाहू कोणाचा विजय होतो, असे देखील सत्तार यावेळी म्हणाले.

 

यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी देखील भाषण केले. राज्याच्या राजकारणात सध्या अफवांचे पीक सुरु आहे.
तुमच्या महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) अडीच वर्षांचे काम आणि आमचे नव्वद दिवसांचे काम, याची तुलना करा.
आम्ही वरचढ नाही आलो, तर हे सरकार खुर्च्या खाली करेल, असे गुलाबराव पाटील म्हणाले.
आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप केले जातात. 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या जातात.
माझे मुंबईवाल्यांना सांगणे आहे की, तुम्हाला शिवसेनेने मोठे केले. आम्ही शिवसेनेला मोठे केले. तुम्ही आत्ममंथन करा. 40 आमदार का पळून गेले, मग काही तरी दोष तुमचाच असेल, असेही पाटील म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | minister abdul sattar and gulabrao patil criticizes uddhav and aaditya thackeray in nandurbar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही