
CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धक्का! राज्यातील मंत्र्याच्या भावानं स्टेटसवर ठेवलं ‘मशाल’ चिन्ह
रत्नागिरी – CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे सहकारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे मोठे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेट्सला शिवसेना ठाकरे गटाचे निवडणुक चिन्ह असलेली मशाल ठेवल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. (CM Eknath Shinde)
किरण सामंत यांनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवलेल्या मशाल चिन्हा खाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशी ओळ आहे. किरण सामंत सध्या राजकारणात जास्त सक्रिय झाले आहेत. उदय सामंत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून राज्याचे मंत्री आहेत. असे असतानाही किरण सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचे निवडणूक चिन्ह स्टेटसला कसे ठेवले, याबाबत चर्चेला उधाण आले आहे. (CM Eknath Shinde)
लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले किरण सामंत लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघ लढवण्यासाठी भाजपा आग्रही असल्याने किरण सामंत यांनी हा इशारा दिला असावा अशी चर्चा आहे.
या संदर्भात किरण सामंत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, मी हे स्टेटस ठेवले होते, त्याला काही कारणे होती, त्याबाबत मी योग्य वेळी बोलेन. परंतु मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून मी ते स्टेटस मागे घेतले. या स्टेटसवर जो भी होगा देखा जायेगा असे लिहिले होते ते १०० टक्के, सगळ्या गोष्टीला माझी तयारी होती. फक्त उदयच्या करिअरच्या दृष्टीकोनातून मी ते मागे घेतले. माझ्यामुळे उदयचे करिअर बाद होऊ नये, खराब होऊ नये त्यासाठी मी ते स्टेटस मागे घेतले.
स्थानिक विरोधकांना इशारा देताना किरण सामंत म्हणाले, जे कोणी स्पष्ट बोलण्याचा आव आणतात,
लोकांना तणतणून दाखवतात, स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून, असे जे कोणी आहेत.
त्यांच्या नो बॉलला मी फ्रि हीट देणारच.
उदय सामंत मंत्री झाल्यानंतर किरण सामंत यांची सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली.
रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या राजकारणात ते सक्रीय आहेत. रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आले आहेत,
त्यामागे किरण सामंत यांचाही मोठा वाटा आहे. किरण सामंत हे व्यावसायिक असून आजपर्यंत त्यांनी कुठलेही राजकीय
पद घेतले नव्हते. ते राजकारणात पुढे नसले तरी पडद्यामागे राहुन ते अनेक कामे करत असतात.
दांडगा जनसंपर्क, कार्यकत्र्यांच्या गाठीभेटी, अडलेल्या लोकांची कामे करणे, या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Ganeshotsav 2023 | ‘आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवाच…’, गणपती विसर्जन मिरवणुकीत साकारला देखावा