मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) आजच्या शेवटच्या दिवशी सभागृहात निवेदन देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या विकासाचं (Mumbai Development) विमान हे अडीच वर्षे अहंकारामुळे रनवेवर रखडलं होतं. मात्र आता विकासाचं विमान भरारी घेत आहे कारण गतीमान सरकार आलं आहे. कुणाच्या तरी अहंकारामुळे बुलेट ट्रेन (Bullet Train) रखडली होती, मुंबईचा विकास रखडला होता हे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) टोला लगावला.
राज्याला 10 वर्षे मागे नेण्याचं काम केलं
एका व्यक्तीच्या अहंकारामुळे राज्यातले प्रकल्प रखडले होते. अडीच वर्षे प्रकल्प रखडल्याने तुम्ही राज्याला 10 वर्षे मागे नेण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आम्ही या प्रकल्पांना गती दिली आहे. बुलेट ट्रेनचा विषय अडीच वर्षे कुणी थांबवला? का थांबवला? आपल्याला माहित आहे. मुंबईसाठी एवढा मोठा प्रकल्प मात्र त्यातही काही जणांनी खोडा घातला. गेल्या अडीच वर्षाच मेट्रोचा प्रकल्प (Metro Project) एक इंच पुढे सरकरला नाही. मात्र आपलं सरकार आल्यानंतर या प्रकल्पाला गती देण्यात आली, हा प्रकल्प आज पुढे जातो आहे. त्यांनी बीएमसी (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) मधील जागा दिली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे जे स्वप्न आहे ते आम्ही पूर्ण करणार असल्याचे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
विधानसभा | अर्थसंकल्पीय अधिवेशन | २५/३/२०२३ https://t.co/s3cUcC98SW
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 25, 2023
अनेकांना पोटदुखी होत आहे
मुंबईच्या विकासाचं विमान गेल्या अडीच वर्षापासून आडमुठ्या आणि अहंकारी धोरणामुळं एअरपोर्टच्या रनवेवर रुतलं
होतं. परंतु आपलं सरकार आल्यानंतर विकासाच्या विमानाने टेक ऑफ घेतला आहे.
त्यामुळे अनेकांना पोटदुखी होते आहे. रखडलेल्या कामांना आपण गती देत आहोत.
मुंबई सुंदर आणि स्वच्छ होत आहे.
मागील अनेक वर्षात जी कामं झाली नाहीत ती आम्ही करत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
ही रोषणाई कायमची आहे
पाडवा मेळाव्यात (MNS Padwa Melava) बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray)
यांनी मुंबईत केलेल्या रोषणाईवरुन शिंदे सरकारवर (Shinde Government) टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत आपण रोषणाई केली. त्यावर काही लोक बोलले.
मात्र ही रोषणाई कायमची आहे तात्पुरती नाही. मुंबईच्या विकासाची जी तळमळ आहे त्यातून आम्ही हे कलं आहे,
असा टोला शिंदे यांनी राज ठाकरेंना नाव न घेता लगावला.
Web Title :- CM Eknath Shinde | mumbai development and important projects stopped due to the arrogance of one person eknath shinde taunt to uddhav thackeray
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update