CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video | BKC वरील दसरा मेळाव्यातील भाषणादरम्यान लोक उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडिओवर CM शिंदेंनी भाष्य टाळले, म्हणाले – ‘ते जाऊ द्या पण…’

मुंबई : CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video | शिंदे गटाच्या बीकेसीवरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना लोक उठून जात असल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यावरून विरोधकही शिंदे गटाची खिल्ली उडवत आहेत. विशेष म्हणजे या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण देणे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही टाळले आणि सभेला जमलेल्या गर्दीवर बोलणे पसंत केले. मुंबईतील विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. (CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्यासाठी बाळासाहेब वंदनीय आहेत. आम्ही त्यांना आमचे दैवतच मानतो. कोणी कितीही काही म्हटले तरी आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहोत. याच कारणामुळे राज्याबरोबरच देशभरातील लोक आम्हाला सोबत करत आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोणी ते व्हिडीओ व्हायरल केले ट्विट करुन, ते जाऊ द्या.
पण शेवटी संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिले. बीकेसीमध्ये किती लोक आले होते? का आले होते? जर आम्ही चुकीचे काम केले असते तर एवढी लोकं समर्थनाला आली असती का? बीकेसीवर दोन लाखांहून अधिक लोक जमले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या बीकेसीवरील दसरा मेळाव्यातील भाषणावर अजूनही टीका होत आहे.
त्यांचे भाषण जवळपास दीड तास सुरु होते. रात्री साडेआठपासून दहा वाजेपर्यंत ते बोलत होते.
यामुळे लोक कंटाळून जाऊ लागले. आलेल्या लोकांनी हळूहळू काढता पाय घेतला.
शिवाय, शिंदे यांनी सर्वच मुद्द्यांना हात घालण्याच्या प्रयत्नात समोर ठेवलेल्या कागदांवरुन ते मुद्दे वाचून दाखवत होते.
तसेच ते सतत घड्याळाकडे पहात होते. यामुळे लोक कंटाळून निघून गेल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title :-  CM Eknath Shinde On Dasara Melava Viral Video | cm eknath shinde on dasara melava video of people leaving ground when he was delivering a speech

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा