CM Eknath Shinde On Kunbi Caste Certificate | मनोज जरागेंच्या आंदोलनाला यश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, कुणबी दाखले देण्याकरिता….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde On Kunbi Caste Certificate | मराठवाड्यातील मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. (CM Eknath Shinde On Kunbi Caste Certificate)

आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने ही समिती स्थापन करण्यात येत आहे. (CM Eknath Shinde On Kunbi Caste Certificate)

ही समिती महसुली, शैक्षणिक व संबंधित नोंदी तपासून मागणीनुसार निजामकालीन ‘कुणबी’ नोंद असणाऱ्या मराठा समाजास ‘कुणबी’ दाखले देण्याकरिता अशा प्रकरणांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे व त्याबाबतची कार्यपद्धती (एसओपी) निश्चित करेल. याबाबत समिती अहवाल तयार करून तो एक महिन्यात शासनास सादर करेल. निवृत्त न्यायाधीश न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, तसेच संबंधित सर्व जिल्हयांचे जिल्हाधिकारी सदस्य म्हणून काम पाहतील. तसेच औरंगाबाद (छत्रपती संभाजी नगर)चे विभागीय आयुक्त समितीचे सदस्य सचिव असतील. यापुर्वीची महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील समिती देखील या समितीस पूरक माहिती देण्याचे काम करेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation Protest | मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा विरोध; राज्य सरकारला दिला इशारा

MHADA Pune Lottery | म्हाडातर्फे 5 हजार 863 सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरूवात

Pune Dahi Handi – Traffic Updates | पुण्यात दहिहंडी उत्सावानिमित्त वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

रास्तापेठ अतिउच्चदाब उपकेंद्र दुरुस्तीसाठी बंद राहणार; मात्र वीजपुरवठ्यावर परिणाम नाही

‘ज्यांनी मराठा आरक्षण घालविले, ते ‘घरातील महामहीम’ उद्धव ठाकरे हे माफी केव्हा मागणार?’,
भाजपचा हल्लाबोल

Aaditya Thackeray | ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट; वाचून दाखवला महायुती सरकारच्या तक्रारींचा पाढा