CM Eknath Shinde | “राज्यातला बळीराजा सुखी समाधानी व्हावा”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठुरायाची महापूजा

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | “बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस यावेत. राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा. पाऊस पडू दे, प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत,” असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विठुरायाच्या चरणी घातले. सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पुजेचा (Vitthal Rukmini Government Puja) मान मला मिळाला, त्यामुळे मी स्वता:ला भाग्यवान समजतो, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आषाढी वारीनिमित्त (दि. 29) (Ashadhi Wari 2023) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा पार पडली. यावेळी मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत, बळीराजाला चांगले दिवस यावेत असे मागणे विठुरायाच्या चरणी मुख्यमंत्र्यांनी केले.

“जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे, तो असाच पुढे नेण्याचे बळ मला मिळावे एवढीच इच्छा मनोमन त्याच्याकडे व्यक्त केली. राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी समाधानी व्हावा, हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले.” त्याचबरोबर मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणाही त्यांनी केली.

आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात (Pandharpur News) दाखल झालेल्या सर्व वारकऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. सलग दुसऱ्या वर्षी विठुरायाची शासकीय पुजा करण्याचे भाग्य मला मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरात येतात. संपूर्ण पंढरपूर आज वारकरीमय झाले. सगळे वातावरण मंगलमय झाले आहे. बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरची सगळी संकट दूर होऊ दे, आपले राज्य सुजलाम सुफलाम होऊ देत हेच मागणे विठ्ठलाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

सर्व प्रशासनाने (Administration) चांगले नियोजन केल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूर मंदिराच्या विकास आराखड्याबाबत सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, यंदा काळे दाम्पत्याला महापूजेचा मान मिळाला. 56 वर्षीय भाऊसाहेब काळे (Bhausaheb Kale) व त्यांच्या 52 वर्षीय पत्नी मंगल काळे (Mangal Kale) यांनी तब्बल 18 तास रांगेत थांबल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली.

Web Title :  CM Eknath Shinde | pandharpur ashadhi ekadashi shasakiya mahapija cm eknath shinde with wife

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा