CM Eknath Shinde | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून शिवप्रेमींना मोठी भेट, किल्ले रायगडावरुन तीन मोठ्या घोषणा (व्हिडिओ)

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे (Shivrajyabhishek Din 2023) यंदाचे 350 वे वर्ष आहे. तिथीनुसार किल्ले रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale), मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवप्रेमींना मोठी भेट दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी किल्ले रायगडावरुन (Raigad Fort) तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी शिवसृष्टी (Shiva Srushti) उभारण्यात यावी अशी मागणी आमदार भरत गोगावले (MLA Bharat Gogawale) यांनी केली होती. त्यांची ही मागणी मान्य झाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, भरत गोगावलेंनी केलेली मागणी सरकारने मान्य केली आहे. 45 एकर जागा शिवसृष्टीसाठी देण्यात आली आहे. शिवसृष्टीसाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार आहे. जसजसे पैसे लागतील तसे पैसे दिले जातील. शिवसृष्टीसाठी पैसे कमी पडणार नाहीत अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/mieknathshinde/status/1664474484932497408?s=20

 

मुख्यमंत्र्यांनी प्रतापगडाबाबत देखील मोठी घोषणा केली. प्रतापगड प्राधिकरण (Pratapgarh Authority) करावे
अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. त्यांची ही मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली.
त्यानुसार आज प्रतापगड प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली.
तसेच या प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार उदयनराजे भोसले असतील असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

Advt.

एकनाथ शिंदे यांनी यावेळी आणखी एक मोठी घोषणा केली ती म्हणजे भवानी तलवारीबाबत.
आज लंडनच्या संग्राहलयात असलेल्या भवानी तलवार (Bhavani Talwar) आणि वाघनख (Vaghanakh)
भारतात परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तेही लवकरच आपल्या महाराष्ट्रात येईल.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आपल्याला मदत करतील.
आपले हे स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title :  CM Eknath Shinde | pratapgad authority president udayanraje bhosale will give 50 crores for shiva shrishti chief minister eknath shindes big announcements

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन – पती-पत्नीस बेदम मारहाण करणार्‍या महिला वकिलावर गुन्हा दाखल

Pune Police News | सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय माने यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन

Pimpri Chinchwad Police – PI/ACP Transfers | पिंपरी-चिंचवड पोलिस : वाकड, पिंपरी विभाग आणि गुन्हे शाखेत एसीपींच्या नियुक्त्या, वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांची सांगवी पो.स्टेशनमध्ये नियुक्ती