CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अडचणीत वाढ? ‘त्या’ प्रकरणात पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) दिलेल्या प्रतिज्ञापत्रात (Affidavit) संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. या प्रकरणी पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभषेक हरदास (RTI Activist Abhishek Hardas) यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या याचिकेची (Petition) दखल घेतली असून साक्षी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

विधानसभा निवडणुकीकरिता (Assembly Elections) वेळोवेळी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत (Nomination Letter) दाखल केलेल्या शपथपत्रातील तफावतींबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याविरुद्ध दाखल खासगी तक्रारी बाबत साक्षी पुरावे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने (Pune Court) तक्रारदारांना दिले आहेत. शिंदे यांनी ठाण्यात निवडणूक लढवली असली तरी तेथील न्यायालयात दाखल असलेल्या तक्रारीची दखल घेत सुनावणी घेण्याचा अधिकार पुण्यातील न्यायालयाला आहे. तसेच तक्रारकर्त्याला तक्रार करण्याची कायद्याने परवानगी आहे, असा निष्कर्ष काढत अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019 साली कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून (Kopari-Pachpakhadi Assembly constituency) उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. शिंदे यांनी 2019 सालच्या प्रतिज्ञापत्रात शेअर्समधील गुंतवणीकीमधील (Shares Investment) युनिटचा तपशील लपवला आहे. या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी आर्माडा जीप (Armada Jeep) 30 जानेवारी 2006 साली 96 हजार 720 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे. तर 2014 च्या प्रतिज्ञापत्रात ही जीप 8 लाख रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले.
2019 च्या प्रतिज्ञापत्रात शिंदे यांनी स्कॉर्पियो जीप (Scorpio Jeep) एक लाख 33 हजार रुपयांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.
तर 2014 प्रतिज्ञापत्रात तीच जीप 11 लाखांना खरेदी केल्याचे नमूद केले आहे.

2019 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी बोलेरो जीप (Bolero Jeep) एक लाख 89 हजार 750 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले आहे.
तर 2014 सालच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी हीच जीप 6 लाख 96 हजार 370 रुपयात खरेदी केल्याचे नमूद केले.
टेम्पो इनोव्हा (Tempo Innova) या वाहनांच्या खरेदीच्या किमतीबाबत तसेच शेत जमीन, व्यापारी गाळ्यांच्या माहितीबाबतही विसंगती असल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर सुनावणी घेण्याचा अधिकार या न्यायालयास आहे, असा युक्तिवाद तक्रारदार यांच्या वकिलांनी केला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | Pune shivaji nagar court order present witness evidence in the complaint against cm eknath shinde election

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rain in Pune | पुण्यातील कात्रज घाटात दरड कोसळली; 15 दिवसातील तिसरी घटना

 

Pune Crime | 10 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या खाजगी सावकारावर गुन्हे शाखेकडून कारवाई

 

Belly Fat कमी करण्यासाठी खा ‘हे’ 5 फूड्स, नॅचरल पद्धतीने कमी करा पोटाची चरबी; जाणून घ्या