CM Eknath Shinde | ‘सावरकर होण्याची लायकी नाही’, एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवर घणाघात; लवकरच राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ सुरू करणार (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantryaveer Savarkar) यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) आक्रमक झाले आहेत. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सोमवारी सावरकरांच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्याभरात ‘सावरकर गौरव यात्रा’ (Savarkar Gaurav Yatra) सुरु करणार असल्याची घोषणा केली. तसेच राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली.

राहुल गांधींच्या पुतळ्याला थोबाडीत मारणार का?

वीर सावरकर यांचा अपमान मणिशंकर अय्यर (Mani Shankar Iyer) यांनी केला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारले होते. काल सभेत वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणणारे अशी हिंमत दाखवणार का? राहुल गांधी यांच्या पुतळ्याला थोबाडीत मारणार का? तुम्ही वीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नेमकं काय करणार? ते तरी सांगा असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना उद्देशून विचारला आहे.

सावरकरांचा अपमान जाणीवपूर्वक केला जातोय

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. त्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. देशभक्तांच्या त्यागातून आणि बलिदानातून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा उपभोग आपण सगळे घेत आहोत. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने वावरण्याचा, निर्णय घेण्याचा अधिकार मिळाला. ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांचा अपमान जाणीवपूर्वक केला जात आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधींविषयी एक शब्द काढला नाही

वीर सावरकर हे फक्त महाराष्ट्राचं दैवत नाही तर संपूर्ण देशाचं दैवत आहेत. अशा दैवताचा अपमान केला जातो आहे. जाणीवपूर्वक केला जातो आहे. विधानसभेत आपण पाहिलं की हिंदुत्व हिंदुत्व करणाऱ्यांनी राहुल गांधी यांच्याविषयी एक शब्दही काढला नाही. उलट राहुल गांधींची खासदारकी कायदेशीर मार्गाने गेली तरी काळ्या फिती लावून काँग्रेसला (Congress) साथ देणारे हेच लोक आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लागावला.

राहुल गांधी यांची लायकीच नाही

राहुल गांधी यांच्यामध्ये हिंमत असेल तर एक दिवस सेल्युलर जेलमध्ये (Cellular Jail) राहून दाखवावं.
मात्र ते तसं करणार नाहीत कारण त्यांच्याकडून ती अपेक्षाच नाही. ते सांगतात मी सावरकर नाही, गांधी आहे.
ते सावरकर होऊच शकत नाहीत त्यांची लायकीच नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर घणाघात केला. ते पुढे म्हणाले, आपल्या देशाची निंदा राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (CM Narendra Modi) यांनाही त्यांनी दुषणं दिली.
आम्ही पुन्हा एकदा वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या आणि आपल्या देशाच अपमान करणाऱ्याचा निषेध करतो, असेही शिंदे म्हणाले.

राज्यभरात वीर सावरकर गौरव यात्रा काढणार

राहुल गांधी जे बोलले त्यामुळे जनतेच्या मनात चिड आहे. मी वीर सावरकर यांच्या त्यागाविषयी मी आणखी
काय सांगू ते आपल्या सर्वांना माहिती आहेच. जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरा शहरांमध्ये वीर सावरकर
गौरव यात्रा आम्ही सुरु करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

Web Title : CM Eknath Shinde | rahul gandhi insulted veer savarkar will he show courage like balasaheb eknath shinde question to uddhav thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police – DG Medals | DG संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्या डीसीपी स्मार्तना पाटील, एसीपी बजरंग देसाई, रूक्मीणी गलांडे, निवृत्त एसीपी प्रतिभा जोशी, लक्ष्मण बोराटे, व.पो.नि. प्रताप मानकर, वैशाली चांदगुडे यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांचा गौरव (Video)

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात, न्यायालय मुख्यमंत्रीपद काढून घेऊ शकते? जाणून घ्या सविस्तर

MNS Leader Sandeep Deshpande | राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला, म्हणाले-‘…की घरी बसून अंडी उबवणार?’