CM Eknath Shinde | भामट्यांची नवी क्लुप्ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची बनावट सही करुन 1.31 कोटींचा गंडा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी अदार पूनावाला (Adar Poonawalla) यांच्या सिरम इन्स्टिट्यूटची (Serum Institute of India) तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक (Fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच दोन तरुणांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची बनावट सही (Fake Signature) करुन एका व्यावसायिकाला तब्बल 1 कोटी 31 लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सही असलेल्या सरकारी व्यवहारांच्या पेमेंट स्लिप (Payment Slip) दाखवून फ्रँचायझी (Franchise) उघडण्याचे आमिष दाखवले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे.

 

वसई तालुक्यातील नालासोपारा येथील जतीन पवार (Jatin Pawar) आणि शुभम वर्मा (Shubham Verma) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याबाबत स्टेशनरी दुकानाचे मालक जिग्नेश गोपानी Jignesh Gopani (वय-50) यांनी वालीव पोलीस ठाण्यात (Waliv Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या (State Government) ई-पोर्टल फ्रँचायझी मध्ये (E-Portal Franchise) खोलणार असून यामध्ये हिस्सेदारी देण्याच्या नावाखाली फिर्यादी यांच्याकडे फी म्हणून एक लाख रुपये मागितले. दोघांनीही सारख्याच वेळा घेतल्या आणि काम सुरु होणार असल्याचे सांगितले. आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 1 कोटी 31 लाख 75 हजार 104 रुपये घेतले.

25 ऑगस्ट रोजी आरोपींनी फिर्यादी यांना ई-पोर्टल फ्रँचायझीसाठी परवाना, परमिट आणि इतर फी भरण्याची स्पिप दिली.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे नाव आणि त्यांची इंग्रजीत स्वाक्षरी होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी फिर्यादी यांना संशयास्पद वाटली. त्यांनी पोलिसांकडे संपर्क साधला.
त्यानंतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपी पैकी एकाला आज (सोमवार) अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

 

Web Title :- CM Eknath Shinde | shopkeeper cheated of 1 crores slip with fake signature cm eknath shinde nodelsp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ramraje Naik Nimbalkar | गोरें हे काय देशातील पक्षाचे मालक झालेत का? आ. रामराजेंचा आ. गोरेंना टोला

Shivendra Raje Bhosale | आपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

MNS On Shivsena | मनसेची शिवसेनेवर टीका, शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर