×
Homeताज्या बातम्याCM Eknath Shinde | दरवर्षी शिवतीर्थावर एकनाथ शिंदे गर्दी जमवत होते; शिंदे...

CM Eknath Shinde | दरवर्षी शिवतीर्थावर एकनाथ शिंदे गर्दी जमवत होते; शिंदे गटाच्या या आमदाराने सांगितली यावर्षी गर्दी जमविण्याची रणनीती

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | शिवतीर्थावर अखेर शिवसेनेला (Shivsena) दसरा मेळाव्यासाठी (Dasra Melava 2022) न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाचा (Court) हा निर्णय शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपासाठी (BJP) मोठा धक्का आहे. आता शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर (BKC Ground) होणार आहे. परंतु, दसरा मेळाव्याला हवी तशी गर्दी झाली नाही तर शिंदे गटासाठी मोठी अडचण होणार आहे. ही गर्दी जमविण्यासाठी आता शिंदे गटाने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांच्या गटाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

 

दरम्यान, नाशिकमधील (Nashik) शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत माहिती देताना म्हटले की, दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहरातून 300-350 बसेस भरून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. त्याचसोबत मनमाड येथून 2 रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत.

 

आमदार कांदे पुढे म्हणाले, दरवर्षी शिवतीर्थावर (Shivtirtha) एकनाथ शिंदे शिंदे (CM Eknath Shinde) गर्दी जमवत होते.
आता तीच तयारी बीकेसी ग्राऊंडवर होणार आहे. नेहमीप्रमाणे तयारी सुरू आहे.
हायकोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात (Supreme Court) जाणार आहोत याबाबत ज्येष्ठ वकिलांशी चर्चा सुरू आहे.

 

आमदार कांदे म्हणाले, नेहमी शिवाजी पार्कवर गर्दी जमवण्याचे काम एकनाथ शिंदे करत असत.
त्यामुळे आम्हाला बीकेसीत गर्दी जमवणे कठीण नाही. लोकांची गर्दी, शिवसैनिकांची (Shiv Sainik) गर्दी,
बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी लोक एकनाथ शिंदे यांच्या सभेला गर्दी करतील. ही गर्दी ओसंडून वाहील.

 

Web Title :- CM Eknath Shinde | tactics for rallying crowds at dussehra melava fairs cm eknath shinde started working target on uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

PFI च्या ‘आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा नाहीच; पुणे पोलिसांचा खुलासा

Jalgaon Accident News | जळगावमध्ये भीषण अपघात ! डॉक्टर मित्रांचा जागीच मृत्यू

Eknath Shinde Group | शिंदे गटाचे हे स्टार प्रचारक भाजपात जाणार?; एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News