CM Eknath Shinde | ‘कायदा मोडणाऱ्याला पाठिशी घालणार नाही’, कोल्हापूरच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांचा इशारा (व्हिडिओ)

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी थेट रस्त्यावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde | कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी (Shivrajyabhishek Din) आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आज (बुधवार) रस्त्यावर उतरल्या आहेत. संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज्याच्या गृह विभागाकडून (Home Department) कोल्हापूर पोलिसांना (Kolhapur Police) तातडीने शहरातील परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या शहरात तणाव असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.

कोल्हापूरातील घटनेवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले,
राज्यात कायदा सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य़ आवश्यक आहे. राज्य सरकार (State Government) सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृह विभागाचे आहे. मी संबंधित अधिकाऱ्यांशी वैयक्तिकरित्या बोलत आहे. ते माझ्या संपर्कात आहेत. गृहमंत्रीही स्वत: अधिकाऱ्यांसोबत बोलत आहेत. कुणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्याला पाठिशी घातले जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

व्हिडिओ पहाण्यासाठी क्लिक करा

https://twitter.com/mieknathshinde/status/1666348100191936513?s=20

कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी थेट रस्त्यावर

दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या सहा
जणांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल रस्त्यावर आहे.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी (IG Sunil Phulari) स्वत: शिवाजी चौकात रस्त्यावर उतरले आहेत.

Advt.

Web Title : CM Eknath Shinde | tension in kolhapur chief minister eknath shindes warning on kolhapur incident law breaker will not be supported

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics News | ‘औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार’, भाजप नेत्याचा शरद पवारांवर ‘प्रहार’

Devendra Fadnavis | ‘एकाचवेळी औरंगजेब व टीपू सुलतानचे उदात्तीकरण हा योगायोग नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही’, देवेंद्र फडणवीसांचा इशारा (व्हिडिओ)

Former NCP Legislator Ramesh Kadam Bail | माजी आमदार रमेश कदम यांना जामीन मंजूर; पण.. राहावे लागणार तुरुंगातच