CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्याला भोवलं, तुरूंगात रवानगी

मुंबई : भांडुप येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबइचे माजी महापौर आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) नेते दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना अटक करण्यात आली आहे. दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात (Bhandup Police Station) गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. (CM Eknath Shinde)

या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना दळवी म्हणाले, मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वात काम करत आहे. केलेल्या वक्तव्याबद्दल वावगे वाटत नाही. कारण, आनंद दिघे यांच्याबरोबर मी काम केलेय. आनंद दिघे यांच्या तोंडी ‘धर्मवीर’ चित्रपटात जो शब्द आहे, तोच मी बोललो. मी घाणेरडा शब्द वापरला नाही. शिवीगाळ केली नाही. मालवणी भाषेत भरपूर शिव्या आहेत. त्या ऐकतानाही वाईट वाटेल. मला तुरुंगवारी नवीन नाही.

ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांना अटक झाल्यानंतर खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी
मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जळजळीत टीका केली. राऊत म्हणाले, दळवींचा गुन्हा काय आहे? त्यांनी जनतेच्या
लोकभावना भांडूपच्या मेळाव्यात व्यक्त केल्या. मुख्यमंत्री किंवा त्यांच्याबरोबरचे गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदू हृदयसम्राट म्हणवून घेत आहेत. त्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे. (CM Eknath Shinde)

संजय राऊत म्हणाले, खरे म्हणजे गद्दार हृदयसम्राटांनी स्वतःला हिंदूहृदयसम्राट म्हणून घेणे वीर सावरकर आणि
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा अपमान आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
मी मुख्यमंत्र्यांना बोलत नाही. मी एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असे म्हणत आहे.

संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू हृदयसम्राट ही पदवी स्वतःला
लावून घेत आहेत. यावर दत्ता दळवींनी शिवसैनिक म्हणून त्या सभेत जोशपूर्ण भाषण केले. ते असे म्हणाले की,
आनंद दिघे असते, तर या गद्दार हृदयसम्राटांना चाबकाने फोडून काढले असते. त्यात ते काय चुकीचे बोलले?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | एसटी बस चालकाला शिवीगाळ करुन मारहाण, रिक्षाचालकाला अटक; लोणी काळभोर येथील घटना

Gold-Silver Rate Today | सोन्याचा नवा विक्रम! चांदी देखील महागली, जाणून घ्या आजचे दर

Maharashtra MLA Disqualification Hearing | ३१ डिसेंबरपर्यंत आमदार आपत्रता निर्णय अशक्य, सुप्रीम कोर्टाकडे राहुल नार्वेकर मुदतवाढ मागणार?