CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा आणि आठवड्याभरात अंमलबजावणी

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन – साधारणपणे आपल्याकडे अशी पद्धत आहे की, मोठे नेते आणि राजकारणी एखाद्या गोष्टीची घोषणा करतात आणि उपस्थित लोक टाळ्या वाजवतात, बातमीदार बातम्या छापतात. त्यानंतर ती घोषणा हवेत विरुन जाते किंवा उशिरा अंमलबजावणी होते. कित्येक वेळा त्या घोषणेचा स्वत: राजकारण्यांना विसर पडतो. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक घोषणा काही दिवसांपूर्वी केली आणि ती थोड्याच दिवसांत कार्यान्वित झाली आहे. यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 19 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी केली होती.

 

त्यांच्या या घोषणेची अहमदनगर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे मोजक्या आठवड्याभरात त्यांची या घोषणेची अंमलबजावणी होईल, असे कोणाला वाटले नव्हते. पासपोर्टसोबत जागेवर कागदपत्रे तपासून जातवैधता प्रमाणपत्र देणारी ‘अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती’ राज्यात पहिली समिती ठरली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे (CM Eknath Shinde) जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ट महाविद्यालयात 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रे वाटण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरात लोणी येथे 97 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सवीकारून 92 विद्यार्थ्यांना व भेंडा येथे 116 विद्यार्थ्यांचे प्रस्ताव
स्वीकारून 109 विद्यार्थ्यांना जागेवरच जातवैधता प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले, मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेली घोषणा व मंडणगड पॅटर्न ची अंमलबजावणी करण्यासाठी
जिल्हा समितीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन जात वैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
यापुढे देखील जिल्ह्यातील महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येईल.

 

Web Title :- CM Eknath Shinde | the announcement made by the cm eknath shinde was immediately implemented in ahmednagar district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

UGC 4 Year Graduation Program | युजीसीचा मोठा निर्णय ! आता 12 वी नंतर डिग्रीसाठी 4 वर्ष लागणार

Social Media Influencer Rohit Bhati | सोशल मीडिया स्टार रोहित भाटीचा भीषण अपघातात मृत्यू

Vinayak Raut | शिंदे सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करतंय; उद्धव ठाकरे शेतकरी संवाद मेळावा घेणार – विनायक राऊत