CM Eknath Shinde | मंत्रिमंडळाचा विस्तार कुठे रखडला ? एकनाथ शिंदेंचे अजित पवारांना रोखठोक उत्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज पीक कर्ज, धरणातील पाणी, कोरोना प्रादुर्भावाची सद्यस्थिती, बूस्टर डोस यासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) रोखठोक उत्तर दिलं. आमचे सरकार चांगले चालले आहे. आम्ही शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले, पेट्रोल-डिझेलचे दर कमी (Petrol-Diesel Rates Reduced) केले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना उत्तर दिलं.

 

शिंदे सरकारला एक महिना पूर्ण होत आहे पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार होत नसल्यामुळे विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला होता. बहुमत असतानाही मंत्रिमडंळ विस्तार कुठे रखडला आहे असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होणार असल्याचे म्हटले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात घेतलेल्या आढावा बैठकीला अजित पवार,
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे (Shiv Sena Leader Neelam Gorhe), भाजपचे चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) अनुपस्थित होते.
तर बैठकीस खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barane), विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao), विविध विभागांचे राज्य आणि विभागस्तरीय अधिकारी, राष्ट्रवादीचे सगळे विधानसभेचे आमदार (NCP MLA),
पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार (Municipal Commissioner Vikram Kumar),
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil),
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Police Commissioner Amitabh Gupta), अंकुश शिंदे (Ankush Shinde) उपस्थित होते.
इतर अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

 

त्याबद्दल संजय राऊतच सांगू शकतात

ईडीच्या (ED) कारवाईमध्ये संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरात पैसे सापडले आहेत.
आता त्यांच्या घरात सापडलेल्या पैशांवर माझे नाव कसे आले हे मला माहिती नाही.
मुळात ज्यांच्या घरात सापडले ते लिहू शकतात ना, माझं नाव कसं काय लिहिलं, त्याबद्दल संजय राऊत सांगू शकतात त्यांना तुम्ही विचारा, असंही शिंदे म्हणाले.

 

केंद्र पुरस्कृत योजनांना गती द्या

प्रधानमंत्री आवास योजनेचे (Pradhan Mantri Awas Yojana) उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करावे.
राज्य आणि केंद्रशासनाच्या योजनांचा आढावा विभागीय आयुक्त स्तरावर घेण्यात यावा. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकार (Central Govt) निधी देण्यास तयार आहे.
केंद्र सरकारकडे प्रलंबित बाबी मार्गी लागण्यासाठी राज्य शासन आवश्यक पाठपुरावा करेल.
अशा विकास योजनांच्या कामाला गती देण्यात यावी, असे शिंदे यांनी सांगितले.

 

 

Web Title : –  CM Eknath Shinde | the cabinet will be expanded soon chief minister eknath shindes reply to ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा