CM Eknath Shinde | जत्रोत्सवाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – इंद्रायणी थडी जत्रेच्या माध्यमातून (Indrayani Thadi Jatra Bhosari) भारतीय संस्कृतीचा अभिमान आणि नारीशक्तीचा सन्मान प्रदर्शित करण्यात आला असून जत्रोत्सवामुळे आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्थेला (Economy) चालना मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. भोसरी येथील गावजत्रा मैदान येथे शिवांजली सखी मंच (Shivanjali Sakhi Manch) आयोजित इंद्रायणी थडी जत्रेच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते.

 

यावेळी खासदार श्रीरंग बारणे (MP Srirang Barane), आमदार संजय शिरसाठ (MLA Sanjay Shirsath), भरत गोगावले (Bharat Gogavle), माजी मंत्री बाळा भेगडे (Former Minister Bala Bhegde) आदी उपस्थित होते.

इंद्रायणी थडी जत्रा भव्यदिव्य आणि हजारोंना एकाचवेळी आनंद देणारी जत्रा असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, भारताची संस्कृती, परंपरा पुढे नेणारा हा उपक्रम आहे.
विविध वयेगाटातील आणि क्षेत्रातील व्यक्तींसाठी भव्यदिव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.
यानिमित्ताने एक हजार स्टॉल द्वारे ८०० महिला बचत गटांना रोजगाराची संधी मिळाली आहे.
महिला बचत गट आणि लहान व्यावसायिकांना अशा महोत्सवातून बाजारपेठ मिळते आणि
त्यातून मोठे उद्योजक तयार होतात. म्हणून अशा महोत्सवाचे आयोजन ही काळाची गरज असल्याचे शिंदे म्हणाले.

सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे आणि राज्याची प्रगती करणारे सरकार आहे.
म्हणूनच कोविडनंतर शासनाने निर्बंध हटविल्याने विविध उत्सव सुरू झाले आहेत.
सर्वसामान्यांच्या आकांक्षांना न्याय देण्याचे कार्य सरकार करत आहे.
सहा महिन्यात सर्व समाजघटकांसाठी निर्णय घेण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
उत्तम आयोजनाबाबत मुख्यमंत्र्यांनी आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांचे अभिनंदन केले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | The economy is getting a boost on the occasion of Jatrotsava – Chief Minister Eknath Shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Supriya Sule | धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या संत तुकाराम महाराजांवर केलेल्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या…

Dhirendra Krishna Shastri | संत तुकाराम महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर देहू संस्थान विश्वस्तांची नरमाईची भूमिका?; म्हणाले…

Lingayat Samaj Protest | मुंबईतील लिंगायत समाजाचा मोर्चा स्थगित, 70 ते 80 टक्के मागण्या पूर्ण

Australian Open | जोकोविचने 22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावून राफेल नादालच्या ‘त्या’ विक्रमाशी केली बरोबरी