CM Eknath Shinde | धक्कादायक! शिंदे गटात या…नाहीतर एन्काऊंटर!! माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी पोलिसांमार्फत दिली धमकी?

नवी मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे खच्चीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आपल्या गटात शिवसेनेशी संबंधीत लोकांना प्रवेश देत आहेत. हे धक्कातंत्र सतत सुरू आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर तर शिंदे गटाने (Shinde Group) हे धक्कातंत्र आणखी वाढवले आहे. मात्र, याबाबतीत एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नवी मुंबई पोलीस उपायुक्तांच्या (Navi Mumbai DCP) माध्यमातुन एन्काऊंटरची (Encounter) धमकी (Threat) देत शिंदे गटात प्रवेश करण्याची जबरदस्ती चालवल्याचा आरोप एका माजी नगरसेवकाने (Former Corporator) केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता या माजी नगरसेवकाने कुटुंबासह आत्महत्या (Suicide) करण्याचा इशारा दिला आहे.

नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम. के मढवी (M. K Madhvi) म्हणाले की, मागील 2 महिन्यापासून शिंदे गटात येण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. माझ्यावर तडीपारीची कारवाई करण्याची नोटीस देत कुटुंबापासून दूर करण्याचे कट रचला जात आहे. नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे (Navi Mumbai DCP Vivek Pansare) यांनी मला शिंदे गटात सहभागी व्हा अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू अशी धमकी देत 10 लाख रुपये मागितले. यामुळे माझ्यावर मानसिक दडपण आले आहे.

एम. के. मढवी यांनी इशारा दिला आहे की, मला, माझ्या कुटुंबाला धोका आहे. शिंदे गटात सहभागी झालो नाही तर एन्काऊंटर करण्याची धमकी दिली आहे. माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करून तडीपार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर माझ्यावर अशी कारवाई होत असेल तर मी, माझं कुटुंब, साडेतीन वर्षाची नात, 2 मुले, सुन, पत्नीसह आत्महत्या करू. आमच्या जीवाला कमी जास्त झाले तर त्याला जबाबदार विवेक पानसरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), संदीप नाईक (Sandeep Naik), विजय चौगुले (Vijay Chaugule) असतील.

खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की,
40 आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. जनता सध्या हवालदिल झाली आहे.
2 महिन्यापासून शिंदे गटात जर कुणी गेले नाही तर त्यांच्या झुणका भाकर केंद्रावर कारवाई केली जाते.
रविवारच्या दिवशी अतिक्रमण कारवाई केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रात या गोष्टी सुरू आहे.
सत्तेचा गैरवापर सुरू आहे. गद्दार निघून गेले जे निष्ठावंत आहेत ते आमच्यासोबत राहिलेत.

खासदार विचारे पुढे म्हणाले की, एम. के मढवी यांनी न ऐकल्याने पोलिसांमार्फत धमकी दिली जाते.
एन्काऊंटर केले जाईल. ही गंभीर बाब आहे. एका कुटुंबावर आत्महत्या करण्याची वेळ येते.
याबाबत मी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पोलीस आयुक्तांशी बोललो आहोत.
महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय. प्रत्येक शिवसैनिकाला अशाप्रकारे त्रास दिला जात आहे.
हे सगळे जनता उघड्या डोळ्याने बघत आहे.

Web Title :- CM Eknath Shinde | the whole family will commit suicide including a three and a half year old granddaughter former corporator warning to eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | अग्नीपथ साठी बनावट डोमिसाईल काढून देणार्‍या दोघा एजंटांना अटक; मुंबई परिसरात रहात असल्याचे काढून दिले डोमिसाईल

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीचे बॅनर्स; परंपरा अखंड राहू द्या म्हणत दिल्या शुभेच्छा