CM Eknath Shinde | हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे, शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, तुमच्यासारखा सत्तेसाठी मिंधा झालो नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात (व्हिडिओ)

खेड/रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी खेडच्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा झाली होती, याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची सभा झाली. या जाहीर सभेतून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले, याच मैदानात फुसका बार, आपटी बार येऊन गेला. उत्तर आरोप, टीकेला द्यायचं असतं. तोच तोच थयथयाट तीच तीच आदळआपट त्याला काय उत्तर देणार? मुंबईतही असाच थयथयाट, आदळआपट मागचे सहा महिने सुरू आहे, असा टोला एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

 

हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे
ज्या काँग्रेस (Congress) देशाला लुटलं, ज्यांनी मुंबईत बाँबस्फोट (Mumbai Bomb Blast) घडवले त्यांच्यासोबत केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलात. काश्मीरमध्ये 370 कलम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हटवलं, ज्यांनी राम मंदिराची (Ram Mandir) उभारणी केली, ज्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे स्वप्न पूर्ण केलं, त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेतली ती चुकीची कशी असा सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला. हा शिंदे गद्दार नाही, खुद्दार आहे, शिंदेच्या रक्तात बेईमानी नाही, आम्ही तुमच्यासारखं सत्तेसाठी मिंधे झालेलो नाही, असा टोला शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

 

त्यांचे सर्कशीप्रमाणे शो होणार आहेत
येत्या काही दिवसांमध्ये मविआच्या राज्यभरात सभा होणार आहेत. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. महाराष्ट्रभर त्यांचे सर्कशीप्रमाणे खेळ होणार आहेत. खोके आणि गद्दार हे दोनच शब्द आहेत. त्याशिवाय तिसरा शब्द नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यात अर्थ नाही, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

तुम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडली
उद्धव ठाकरे यांनी आधी सांगितले मी मुख्यमंत्री होणार नाही. त्यानंतर शरद पवार साहेबांनी (Sharad Pawar) सांगितलं असं म्हणत मुख्यमंत्री झाले. तेही ठिक, पण त्यानंतर तुम्ही हिंदुत्वाची भूमिका सोडली. बाळासाहेबांचा विचार बाजूला सोडला आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करायला निघालात. कोकणातल्या लोकांनी बाळासाहेबांवर प्रेम केलं, त्यांच्या विचाराला पाठिंबा दिला, तोच विचार आम्ही पुढे घेऊन जातोय, त्यामुळे कोकण आपल्यासोबत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

शिवसेना वाचवण्याचं काम केलं
याच सभेने तुम्हाला उत्तर दिलं आहे. कोकणी माणूस बाळासाहेबांच्या, शिवसेनेच्या (Shiv Sena Party) आणि धनुष्यबाणाच्या पाठीशी आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे (NCP) दावणीला बांधला, धनुष्यबाण (Dhanushyaban Symbol) गहाण ठेवला. आम्ही धनुष्यबाण, शिवसेना वाचवण्याचं काम केलं. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी बेईमानी विश्वासघात केला, तो डाग पुसण्याचं काम आम्ही केलं. सत्तेसाठी भूमिका बदलता, तडजोड करता म्हणून आम्हाला असं करावं लागलं, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

 

हे कसलं हिंदुत्व?
राहुल गांधी सावरकरांचा (Veer Savarkar) अपमान करतात, त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प बसलात. मणिशंकर अय्यरला (Mani Shankar Iyer) बाळासाहेबांनी चपलेने झोडलं होतं. पण राहुल गांधी यांच्या विधानाविषयी आपण काहीही बोलला नाहीत, हे कसलं हिंदुत्व? म्हणून आम्ही हा निर्णय घतेला, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

अशोक चव्हाणांनी शेण खाल्लं, तुम्हीही…
तुमच्या डोक्यात पवारांनी मुख्यमंत्रीपदाचा बल्ब पेटवला आणि सगळंच बिघडलं. सगळे वाईट होते ते चांगले झाले, सगळं विसरुन गेलात.
अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) शेण खाल्लं असं तुम्ही म्हणालात, मग त्यांच्या पंगतीत बसून तुम्ही काय खात आहात, सांगा? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कोण कोणाला डोळा मारत होता, ते आपण पाहिलं. गळ्यात गळे घालत आहेत ते कधी गळा दाबतील कळणार नाही.
त्यांचा पूर्व इतिहास तपासून बघा, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना पुढीचा धोका सांगितला.

 

शिवसेनेसाठी केसेस अंगावर घेतल्या
शिवसेनेसाठी आयुष्य घालवलं, केसेस अंगावर घेतल्या त्यांना तुम्ही गद्दार आणि खोके म्हणता,
तुम्हाला बोलताना थोडतरी काही वाटलं पाहिजे. एकनाथ शिंदेंच्या अंगावर 109 केसेस आहेत.
तुमच्यावर किती केसेस आहेत? तुम्हाला बोलायचा अधिकार काय? असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं.

 

दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील
माझ्या संघर्षावेळी 50 आमदार आणि 13 खासदारांनी मला साथ दिली. तुमची भूमिका चुकतीये,
असं सांगायला काही आमदार त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले, तुम्हाला जायचं तर तुम्हीही जा… अशी संघटना कशी वाढेल? मला त्यांना सांगायचंय,
दरवाजा उघडाच ठेवा, सगळे जातील. तुम्ही हम दो हमारे दो एवढेच राहाल.
मग तुमचं कुटुंब आणि तुमची जबाबदारी एवढंच काम, असा टोला शिंदे यांनी लगावला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | This Shinde is not a traitor, he is Khuddar, there is no dishonesty in the blood of Shinde, he has not become greedy for power like you; Eknath Shinde attacks Uddhav Thackeray (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | ‘फडणवीसांना ‘या’ पदावर बघायला आवडेल’, छगन भुजबळांनी सांगितली ‘मन की बात’

Aaditya Thackeray | दीपक केसरकारांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ते तर माझ्या आजोबांकडे…’

Pune Crime News | शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातून आरोपीचा पलायन करण्याचा प्रयत्न, पण…