CM Eknath Shinde Vs Shivsena | ‘मुले पळवणारी टोळी ऐकलेय, पण बाप…’, शिंदे गटाविरोधात फलकबाजी; नवरात्र मंडळाचे फलक पोलिसांनी हटवले

मुंबई : CM Eknath Shinde Vs Shivsena | एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेत केलेल्या बंडखोरीचे पडसाद अजूनही उमटत असून शिवसैनिक (Shiv Sainik) आपला संताप वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वीच धारावीत शिवसेना आणि शिंदे गटात (Shinde Group) शिवीगाळ झाली होती. आता येथे पुन्हा एकदा बंडखोर शिंदे गटाविरोधात फलक लावण्यात आले होते. पोलिसांनी हा फलक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगत काढून घेतला. (CM Eknath Shinde Vs Shivsena)

मुंबईतील धारावी परिसरातील एका नवरात्र उत्सव मंडळाने (Navratri Festival Mandal), मुले पळवणारी टोळी ऐकली आहे, पण बाप पळवणारी टोळी पहिल्यांचा बघतोय, असा मजकूर असलेला फलक लावला होता. या फलकामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मंडळाच्या अध्यक्षांना पोलीस ठाण्यात बोलावून संबंधीत फलक काढण्यास सांगितले. त्यानंतर हा फलक काढण्यात आला.

सरवणकर गटाची गुरूवारी बैठक धारावी मील कंपाऊंड येथे मॉर्निंग स्टार शाळा येथे आयोजित करण्यात आली होती.
त्यावेळी पुन्हा वाद झाला. ही बैठक संपल्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी आणि शिवीगाळ केली.
त्यानंतर पोलिसांनी शिवसैनिकांना शांत केले गेले.

त्यानंतर धारावी पोलिसांनी याप्रकरणी राजेश सुर्यवंशी (Rajesh Suryavanshi), मुथू पठाण (Muthu Pathan),
चेतन सुर्यंवशी (Chetan Suryavanshi) यांच्यासह इतर 4-5 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला
होता. धमकावणे, जमाव बंदी, पोलिसांचा आदेश न मानणे अशा विविध कलमांतर्गत धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल
केला होता. यामुळे प्रभादेवीनंतर धारावी येथील राजकीय वातावरण तापले असून पोलीस सतर्क झाले आहेत.

Web Title :- CM Eknath Shinde Vs Shivsena | police taken action on the navratri group that put up banners against the shinde group in dharavi mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | ओबीसी आरक्षण बाबत बोलताना तारतम्य बाळगा, मराठा क्रांती मोर्चाचा तानाजी सावंत यांना निर्वाणीचा इशारा

Loss Belly Fat | ‘या’ आहेत त्या 5 गोष्टी ज्या फॉलो केल्याने कमी होईल वजन, गायब होईल पोटाची चरबी