CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | ‘सामना’तील मुलाखतीवरून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘तुम्ही आमचे आई-बाप काढता, आम्ही…’

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | आम्ही जीवाची बाजी लावून शिवसेना (Shivsena) मोठी केली आहे. शिवसेना अशीच मोठी झालेली नाही. वयाच्या 16 व्या वर्षापासून आम्ही शिवसेना वाढीसाठी मेहनत करतोय. तुम्ही आमचे आईबाप काढता. आम्ही कधी आमच्या आई-बापांना भेटलो, कधी आमच्या मुलाबाळांना भेटलो ते सांगा. आम्ही वर्षातून दोन दोन, तीन तीन वेळा परदेशात गेलो नाही. फक्त शिवसेना एके शिवसेना करत राहिलो, असे म्हणत आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले. (CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

 

उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बंडखोरीनंतर आक्रमक पवित्रा घेतला असून ते सातत्याने बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) शाब्दिक प्रहार करत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये तर ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत त्यांचे वाभाडे काढले होते. यावरून शिंदे यांनी ही टीका केली. एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौर्‍यावर असून त्यांनी आज मालेगावमध्ये सभेला संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.

 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही कधी वेळ-काळ बघितला नाही, दिवस-रात्र बघितली नाही. शिवसेना अशीच मोठी झाली आहे का? बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांमधून शिवसेना मोठी झाली. वेगवेगळ्या विभागात दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत (Dada Bhuse, Gulabrao Patil, Uday Samant) यांच्यासारख्या आमच्या नेत्यांच्या मेहनतीमुळे शिवसेना मोठी झाली. आरोप-प्रत्यारोप करणे माझा स्वभाव नाही. परंतु आम्ही गद्दारी केली, विश्वासघात केला, असे आरोप झाले.

शिंदे पुढे म्हणाले, भाजपा-शिवसेना (BJP-Shivsena) युतीने निवडणूक लढलो. लोकांनी आपल्याला कौल दिला. त्या लोकांसोबत सत्तास्थापन करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (Congress-NCP) सत्ता स्थापन केली आणि मुख्यमंत्रीपद मिळवले. मग गद्दारी आम्ही केली का? विश्वासघात आम्ही केला का? हा विचार करण्याची आवश्यकता आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेशी विश्वासघात आम्ही केला की इतर कुणी केला. CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray

 

शिंदे यांनी मालेगावमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. शिंदे म्हणाले, जनावरांचा मृत्यू झाला असेल, घर आणि गोठ्यांचे नुकसान झाले असेल त्यांना नुकसान भरपाई तातडीने देण्यात येईल.

 

शिंदे पुढे म्हणाले, वनहक्क पट्टे प्रकरणे युद्ध पातळीवर निकालात काढली पाहिजेत.
36 लाख रकूल आणि पारंपारिक शेतीला आधुनिक शेतीची जोड दिली पाहिजे.
यासाठी कृषी विद्यापिठांना बळकटी द्यावी लागेल. शेतकर्‍यांनी विविध देशातील आणि इतर राज्यांतील शेतकर्‍यांच्या शेती पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
क्लस्टर आणि सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. क्लस्टर शेतीला राज्य शासन (State Government) प्राधान्य देईल, असे शिंदे म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | eknath shinde verbal attack on uddhav thackeray over saamana interview

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

NCP Chief Sharad Pawar On Bhagat Singh Koshyari | कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

 

MLA Ravi Rana On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपाल एक सरळ, सज्जन व्यक्तिमत्व’ – आमदार रवी राणा

 

Arjun Khotkar | ‘उद्धव ठाकरेंशी बोलून CM एकनाथ शिंदेंना पाठिंब्याचा निर्णय’ – अर्जुन खोतकर