CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | …यामुळेच उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली, मंत्री दादा भुसे यांची टीका, म्हणाले – खोके, ओके, गद्दार, खंजीर यापुढे शब्द नाहीत

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील ऐरोली येथे हिंदूगर्वगर्जना शिवसेना संपर्क यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना बंदरे आणि खनिज मंत्री दादा भुसे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले की, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आमदार, खासदार, शिवसैनिकांना भेटले नाहीत. प्रश्न सोडविले नाहीत. यामुळेच त्यांच्यावर ही वेळ आली. त्यांच्याकडे खोके, ओके, गद्दार, खंजीर यापुढे शब्द नाहीत. शिवसैनिकांना खोकी देऊन विकत घेणारा जन्माला यायचा आहे. (CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

 

दादा भुसे यांनी नवीन सरकारने केलेल्या कामांची माहिती देताना म्हटले की, शेतकर्‍यांना दुप्पट नुकसान भरपाई दिली जात आहे. नवी मुंबईत मोडकळीस आलेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्त, झोपडपट्टी वासीयांचे प्रश्न सोडविले जाणार आहेत.

 

ते पुढे म्हणाले की, मागील मुख्यमंत्री अडीच वर्षात आमदार, खासदारांना भेटले नाहीत. वर्षा निवासस्थान सामान्यांसाठी बंदच होते. आत्ता संपर्क यात्रा, मेळाव्यासाठी फिरत आहेत. त्यापैकी दहा टक्के तेव्हा फिरले असते तरी ही वेळ आली नसती. शिवसेनाप्रमुख महापुरुष आहेत. ते एका कुटुंबाची मालकी नाहीत. त्यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढावा व मग जनतेत जावे. त्यांना खोके, ओके, गद्दार, खंजीर या पलीकडे बोलता येत नाही. (CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray)

यावेळी माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले म्हणाले, शिवसेनेचा नवी मुंबईचा बालेकिल्ला भक्कम राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढवू. माजी मुख्यमंत्री अडीच वर्षात घरातून बाहेर पडले नाहीत. एकनाथ शिंदे सर्वाधिक लोकांमध्ये मिसळणारे मुख्यमंत्री आहेत.

 

यावेळी विजय नाहटा यांनी आरोप केला की, गद्दार म्हणणार्‍यांकडे दुर्लक्ष करा.
तेच गद्दार आहेत. अडीच वर्षात कधीच शिवसैनिकांना भेटले नाहीत.
उपनेत्या शितल म्हात्रे, संध्या वडावकर यांनीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टीका केली.
या कार्यक्रमात मुंबईमधील शिवशंभू गोविंदा पथकातील मृत गोविंदा संदेश दळवी
यांच्या कुटुंबीयांना विजय चौगुले यांनी 1 लाख रूपयांची मदत केली.

 

Web Title :- CM Eknath Shinde Vs Uddhav Thackeray | rebel leader dada bhuse targets
shivsena uddhav thackeray khoke ok no longer have words balasaheb thackeray
does not belong to any single family dada bhuse navi mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा