CM Eknath Shinde | ‘पहाटेच्या शपथविधीला जयंत पाटील होते ?’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विधानसभा अधिवेशनाच्या (Assembly Session) शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात जोरदार टोले लगावत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी थेट पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगितला. तसेच त्यावेळी अजित पवारांनी घाई केली, असा खोचक टोला लगावला.

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, अजित पवारांनी मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला आहे. मी कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझा तो स्वभाव नाही. आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. आम्ही श्रद्धा आणि सबुरीनेच वागतो आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे (Balasaheb Thackeray) आशीर्वाद आहेत आणि आनंद दिघेंवर (Anand Dighe) आमची श्रद्धा आहे.

 

अजित पवारांनी सकाळी घाई केली. सबुरीने घेतले असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंतराव (Jayant Patil), मला बोलले, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यावेळी मला आमच्या प्रमुखाचा फोन आला तेव्हा मी जयंत पाटील फोन उचलत नाहीत असं सांगितले. मी बोललो जयंत पाटील तिथेच आहे, असा किस्सा एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितला.

 

नेमकं काय झालं ?

तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला. अरे टीव्ही बघितला का ? तर मी पाहिलं तेव्हा दादा शपथ घेत होते.
मला वाटलं मागचे कधीच दाखवतायेत. तर नाही हे आत्ताचं आहे असं मला सांगितले. मला विचारलं, अरे काय चाललंय.
जयंतरावांना मी फोन करतोय ते फोन उचलत नाही. तेव्हा अनिल पाटील (Anil Patil) पाठमोरे उभे होते.
मला वाटलं जयंत पाटील तिथेच आहे. पण ते जयंत पाटील नव्हते. जयंत पाटील पण गेलेत असं मी सांगितले.
तुम्ही गेला असता तर कार्यक्रम ओक्केच झाला असता असा टोला एकनाथ शिंदेंनी राष्ट्रवादीला (NCP) लगावला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | was jayant patil at the early morning swearing in ceremony with ajit pawar cm eknath shinde target ncp

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा