CM Eknath Shinde | ‘बोम्मईंच्या नावानं खोटं ट्विट, त्यामागे कोणता पक्ष हेही समजले’, मुख्यमंत्र्यांची सभागृहात माहिती

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारपासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला (Nagpur Winter Session) सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पहायला मिळाले. राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन (Maharashtra-Karnataka Border Issue) राज्य सरकारला घेण्याचा प्रयत्न केला. बेळगावात लोकप्रतिनिधींना जाऊ दिलं जात नाहीय, तर तिथले मुख्यमंत्री उघड उघड महाराष्ट्राची बदनामी करणारी विधानं करत आहेत तरी सरकार काही बोलत नाही असा हल्लाबोल केला. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रत्यत्तर दिले. सीमा वादाबद्दल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्यासोबत झालेल्या बैठकीची सविस्तर माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सभागृहात दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, सीमाभागातील बांधवांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. या गोष्टीचं राजकारण केलं जाऊ नये. राजकारण करण्यासाठी इतर बरेच मुद्दे आहेत. मात्र, या प्रश्नावर आजवर कोणत्याच केंद्रीय गृहमंत्र्यांनी दखल घेतली नाही. अमित शाह यांनी यात लक्ष घालून मध्यस्थी केली. यावेळी मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची बाजू तिथं मांडली. यात बोम्मईंकडून (CM Basavaraj Bommai) केली जाणाऱ्या ट्विटसचाही मुद्दा मांडला. त्यावर बोम्मईंनी ते ट्विट्स आपण केली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच ते ट्विट कुणी केलीत याचीही माहिती त्यांच्या सरकारनं शोधून काढली आहेत. तसेच हे ट्विट कोणत्या पक्षाने केली आहेत याचीही माहिती समजली आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाचं राजकारण करण्यापेक्षा तिथल्या बांधवांच्या पाठिशी कसं उभं राहता येईल हे पाहिले पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

आम्ही पोलिसांचे फटकेही खाल्ले

सीमा प्रश्नावरुन आता एवढी आगपाखड करणारे नेते बेळगावतील मराठी भाषिकांवर अन्याय होत होता आणि
आम्ही तिथं गेलो होतो. पोलिसांचे (Karnataka Police) फटकेही खाल्ले आहेत.
छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) सार ठावूक आहे.
तुरुंगवासही भोगला आहे आणि तुम्ही आम्हाला म्हणता सीमावादाचं आम्हाला काय पडलेलं नाही?
आता जे बोलत आहेत त्यावेळी ते लोक कुठे होते? कोणत्या आंदोलनात ते कधी होते?
असा आक्रमक पवित्रा घेत शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

Web Title :- CM Eknath Shinde | we know who made the fake tweet in the name of bommai we also know which party is behind it says cm eknath shinde

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ankita Lokhande | टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेचे बोल्ड फोटो होताहेत व्हायरल

SGB Scheme | RBI देणार स्वस्त सोने खरेदी करण्याची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या कितीमध्ये खरेदी करू शकता १ ग्राम

Amruta Deshmukh | विकास सावंत पाठोपाठ अमृता देशमुखचीही बिग बॉसच्या घरातून एक्झिट