CM Eknath Shinde | ‘त्यामुळेच हे सरकार बदलावं लागलं’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पदवीधर निवडणुकीमध्ये (Graduate Election) महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ताळमेळ पहायला मिळत नसल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना विचारले असता, महाविकास आघाडीत ताळमेळ नाही हे आम्ही अडीच वर्षापासून सांगत होतो त्यात नवीन काय? त्यामुळेच तर हे सरकार बदलावं लागलं असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला. वांद्रे-कुर्ला संकुल मैदानावरील पंतप्रधानांच्या सभा स्थळाच्या पाहणीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा दौरा मुंबईत होत आहे. मुंबईतील जी विकासकामं आहेत त्यांचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. काँक्रिटचे रस्ते, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (Balasaheb Thackeray Aapla Dawakhana), तीन रुग्णालयांचं भूमिपूजन, मुंबईतील 2A आणि 7A चं लोकार्पण केलं जाणार आहे. या सगळ्या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी करत आहोत. मुंबईकर या कार्य़क्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी व्यक्त केला.

 

 

म्हणून आमच्यावर आरोप होत आहेत
सरकार म्हणून आम्ही जे काम करतो आहोत त्यामुळे अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. छातीत धडकी भरली आहे त्यामुळे आरोपांवर आरोप करण्यात येत आहे. तसेच मुंबईचा आम्ही विकास करतो आहोत त्यामुळे काहीजणांचे नुकासान होणार असं दिसतंय म्हणून आमच्यावर आरोप होत आहेत, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

कुणाला नुकसान होत असेल तर…
गेली 25 वर्षे खड्ड्यांमुळे मुंबईकरांना यातना भोगाव्या लागल्या आहेत. माध्यमांनी खड्डे दाखवले,
त्यात बळी गेलेल्यांच्या बातम्या दाखवल्या. खड्डे दुरुस्तीसाठी जे कोट्यवधी रुपये टाकले जातात ते वाया जाणारे पैसे आहेत.
यामुळे आम्ही सिमेंटचे रस्ते तयार करत आहोत. पुढे 25 ते 30 वर्षे हे रस्ते आम्ही तयार करत आहोत.
आम्ही जे काम करतो आहोत त्यामुळे कुणाला तरी नुकसान होत असेल तर मी त्यावर बोलू इच्छित नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले.

 

आम्ही विकासकामांना चालना दिली
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कधीही काम करत नाही, यापुढेही करणार नाही.
बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप (BJP) यांचं सरकार आल्यानंतर विकासकामांना गती मिळाली आहे.
आमचं सरकार आल्यानंतर आम्ही विकास कामांना संधी दिली आहे.
मागील अनेक वर्षे मुंबईकरांनी खड्ड्यांतून प्रवास केला आहे.
त्यामुळे खड्डेमुक्त मुंबई करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून त्याचेही भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | we said that there is no harmony in the mahavikas aghadi two and a half years ago what is new in that ask cm eknath shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC News | कैलास स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी दहा दिवस बंद राहणार

Nashik Graduate Constituency | आमदार कपिल पाटील यांचा सत्यजीत तांबे यांना पाठिंबा

Pune Crime News | गैरव्यवहार प्रकरणात कारागृहात असणारे मंगलदास बांदल 21 महिन्यानंतर बाहेर येणार, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर