मुख्यमंत्री घेणार मराठवाड्यातील दुष्काळाचा औरंगाबादमध्ये आढावा 

आौरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाईन 
मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती आेढवलेली असल्याने आैरंगाबादमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी आढावा बैठक घेणार आहेत. विभागीय आयुक्त आणि आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीला हजर राहतील. गृहमंत्री म्हणून यावेळी ते गुन्ह्यांबाबतचाही आढावा बैठकीत घेण्यात येणार आहेत. या वर्षी मराठवाड्यात सरासरीच्या 62 टक्के पाऊस पडलाय. या वर्षी पाणीसाठ्याचीही भीषण अवस्था आहे. त्यात खरीपाचा हंगाम पूर्णतः वाया गेलाय. सरकारी आकडेवारीनुसार, मराठवाड्यात तीन हजार गावांवर दुष्काळाचं सावट आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड या जिल्ह्यांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसणार आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e2fec6d7-cbe4-11e8-a23c-f1977e113710′]

औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील तीन हजार गावांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आली आहे.  खरीप हंगामाची पैसैवारी जाहीर झाली आहे. याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. नजर अंदाजाने काढलेल्या आणेवारीत मराठवाड्यातील 8 हजार 533 गावांपैकी तब्बल 2 हजार 958 गावांची पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. म्हणजे ही सगळी गावं दुष्काळाच्या भीषण सावटाखाली आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाने हा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला आहे.

[amazon_link asins=’B06Y6MHSVR,B06Y5P68KC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f2127d87-cbe4-11e8-ad02-cd64d56198a4′]

औरंगाबाद जिल्ह्यातील 1355 गावांपैकी 1335 गावांची पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. जालन्यातील 971 गावांपैकी 952 गावांची पैसैवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी आली आहे. बीडमधील एकूण 1402 गावांपैकी 671 गावांती पैसैवारी 50 पेक्षा कमी आली आहे. यामुळे मराठवाड्यातील पैसैवारीचा हा अहवाल मदत व पुनर्वसन खात्याला मराठवाडा विभागीय आयुक्तांकडून पाठवण्यात आलाय. पावसाअभावी नगदी पीक मूग आणि उडीद हातातून गेलं आहे. सोयाबिन, कापूसही हातचा गेल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद, बीड आणि जालनामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे. औरंगाबादेत आतापर्यंत 53.29 टक्के, जालन्यात 61 टक्के तर बीडमध्ये 50 टक्के इतका पाऊस झाला आहे. संपूर्ण मराठवाड्यातच वार्षिक सरासरीच्या फक्त 64 टक्के पाऊस झाला.

नांदेड डिमार्ट समोरील जय रेसिडेन्सी मध्ये घरफोडी; तीन लाखांचा ऐवज लंपास