मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन बिल्डरला 3 कोटीत दिली: काॅंग्रेस

मुंबई : पोलीसनामा आॅनलाइन
नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जागेबाबत मोठा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप करत काॅंग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे. सदर घोटाळ्याची व्याप्ती एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल एक हजार 767 कोटी रुपये असल्याचा दावा काॅंग्रेसने पत्रकार परिषदेत केला आहे.
सिडकोच्या ताब्यात असलेल्या जागेची किंमत तब्बल एक हजार 767 कोटी रुपये असताना देखील ती फक्त तीन कोटी रुपयामध्ये बिल्डर मनिष भतिजा आणि संजय भालेराव या दोघांना विकण्यात आल्याचा आरोप काॅंग्रेसने केला आहे. यावेळी संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाण, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी हे नेते उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07FH4PDHJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f3d2e599-7dfe-11e8-957e-0f2f90398081′]
यावेळी बोलताना संजय निरुपम म्हणाले की, कोयना धरणाच्या आठ प्रकल्पग्रस्तांना दिलेली 24 एकर जमीन प्रति एकर 15 लाख दराने बिल्डरने विकत घेतली असून, यामध्ये मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचेही ते म्हणाले. हे बिल्डर भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय प्रसाद लाड यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे ते भागीदारीत देखील असण्याची शक्यता काॅंग्रेसने व्यक्त केली आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ff906bbb-7dfe-11e8-9f09-7dc8fd3f705d’]
14 मे रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं. त्याच दिवशी जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी बिल्डर्सना मिळाली. या प्रक्रियेला दीड वर्ष लागत असताना 24 तासात हे कसं शक्य झालं, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादानेच हा सर्व व्यवहार झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. फडणवीस हे ‘क्लीन चिट मिनिस्टर’ असून सर्वांना ‘क्लीन चिट’ देत असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.