आता मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने या संदर्भातील लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला मंजुरी दिली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी केली होती. दरम्यान अण्णा हजारे यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारने लोकायुक्त उपलोकायुक्त अधिनियम सुधारणेला मंजुरी दिल्याने लोकायुक्तांच्या कक्षेत आता मुख्यमंत्री येणार असून, मुख्यमंत्र्यांची इन कॅमेरा चौकशी करण्याचे अधिकार लोकायुक्तांना प्राप्त होणार आहेत.

काय म्हंटले होते अण्णा हजारे ?
जनलोकपाल बिल पास झाल्यानंतर 5 वर्षे होऊनही सरकारकडून अद्याप लोकायुक्त नेमले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने याबाबतीत सरकारला अनेकदा लोकायुक्त नेमण्यासाठी आदेश देऊनही सरकार त्याला दाद देत नाही. लोकपाल लोक आयुक्त एवढा महत्त्वाचा कायदा असूनही सरकार 5 वर्षे झाली तरी टाळाटाळ करीत आहे. मोदी सरकार संविधानिक संस्थांचे काहीएक ऐकत नाही. आम्ही सत्तेवर आलो तर लोकपाल लोक आयुक्ताची अंमलबजावणी करु असे आश्वासन सरकारने देशासमोर देऊनही 5 वर्षात सरकारने कोणतीही अंमलबजावणी केली नाही. सरकार देशाला लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे नेत आहे. जर हे सरकार संविधानिक संस्थांचे ऐकत नसेल तर याचा अर्थ असा होतो की, हे सरकार देशाला हुकुमशाहीकडे नेत आहे. जनतेसाठी हाच सर्वात मोठा धोका आहे. म्हणूनच येत्या 30 तारखेला मी माझ्या गावात उपोषणाला बसणार आहे.

मोदी सरकारला ‘ही’ योजना डोईजड ; ४० टक्के पैसे पडून

सरकारला शेतकर्‍यांपेक्षा उद्योगपतींची चिंता जास्त आहे हे सांगताना अण्णा म्हणाले की, सरकारने आजवर उद्योगपतींचे करोडोंचे कर्ज माफ केले आहे. विशेष म्हणजे याबाबत माझ्याकडे आकडेवारी देखील आहे. एकीकडे उद्योगपतींचे करोडोंचे कर्ज सरकार माफ करते आणि शेतकर्‍यांना 5 हजार रुपये द्यायला सरकारला नाकीनऊ येतात. म्हणून मी आता आंदोलन करण्याचे ठरविले आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर अण्णा म्हणाले, शेतकर्‍यांच्या शेतीमालास खर्चावर आधारित भाव मिळावा. दुसरे म्हणजे ज्या शेतकर्‍यांचे वय 60 वर्षे आहे अशा शेतकर्‍याला दुसरं कोणतंही उत्पन्नाचं साधन नसेल तर त्याला सरकारकडून 5 हजार रुपये पेंशन मिळावी. आज शेतकरी बटाटा, दुध, कांदा, टोमॅटो रस्त्यावर फेकतो कारण त्याला भाव मिळत नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्षे होतात तरी देशातील शेतकरी आत्महत्या करतो.अण्णा हजारे यांच्या उपोषणाला विविध संघटनांचा पाठींबा आहे हे सांगताना अण्णा म्हणाले की, माझ्या गावात मी करणार असणार्‍या या उपोषणाला विविध संस्थांचा पाठींबा आहे. विशेषत: राष्ट्रीय किसान संघटन. या संघटनेचे तब्बल 20 राज्यात संघटन आहे. सदर वीसही राज्यांमध्ये आंदोलन करणार असल्याचे संघटनेने सांगितले आहे. 5 दिवसांपूर्वी मी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी सभेसाठी देशातील विविध राज्यातून तब्बल 500 कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. सदर कार्यकर्ते त्यांच्या भागात आंदोलन करणार आहेत.

शिवसेनेच्या ‘या’ उपनेत्यावर पोलीसांकडून तडीपारीचा प्रस्ताव
मोदींच्या नेतृत्त्वाखाली आपण स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत साकारू : फडणवीस