आंध्रच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘त्याने’ मागितली मदत : मुखमंत्र्यांनी दिले ‘इतके’ पैसे कि तो…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्रप्रदेशमध्ये विधानसभेच्या देखील निवडणूका झाल्या होत्या. त्यात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने घवघवीत यश मिळवत १७५ पैकी १५२ जागा जिंकत तेलगू देसमचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात लोकहिताचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जगनमोहन यांनी स्वतःच्या कार्यालयातील वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा आदेश पहिल्याच दिवशी दिला आहे. त्यानंतर आता त्यांनी एका कॅन्सर पीडिताची मदत करून आदर्श मुख्यमंत्री असल्याचे दाखवून दिले.

विमानतळाबाहेर मदत मागणाऱ्याला त्यांनी चक्क २०लाख रुपये दिले आहे. तो व्यक्ती कॅन्सर पीडितांसाठी मदत याचना करत होता. याआधी देखील त्यांनी अनेक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी त्यांनी आपल्या कार्यालयातील वृद्धांची पेन्शन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. एक हजार रुपयांवरून ती तीन हजार रुपये करण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता.

दरम्यान, शपथ घेताच त्यांनी अनेक प्रशासकीय बदल करण्यास सुरुवात केली असून, अनेक आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्याआधी त्यांनी चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय संस्थांना आंध्रप्रदेशमध्ये येण्यासाठी घातलेली बंदी उठवून मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता ते मोठ्या प्रमाणात लोकहिताचे निर्णय घेताना दिसून येत आहेत.