पश्चिम बंगालमध्ये ममता दीदी पुजार्‍यांना देणार घर

पोलिसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमध्ये इमामांना आर्थिक मदतीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता ब्राम्हण पुजार्‍यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. पुजार्‍यांना महिन्याला 1 हजार आणि राहायला घर देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यात इमामांना आर्थिक मदत देण्याची घोषणा 8 महिन्यांपूर्वी त्यांनी केली होती. त्यानंतर भाजपने जोरदार टीका केली होती.

सनातन धर्माचे ब्राम्हण पुजारी अनेक वर्षांपासून मठ आणि मंदिरात पूजा-अर्चा करत आहेत. मात्र त्यांना कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही. त्यांना मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दूर्गा पुजेच्या काळापासून मदतीला सुरुवात केली जाणार आहे. आम्ही सर्वधर्म मानणारे असल्याचे ममता यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ममता बॅनर्जी यांचे सरकार हे हिंदू विरोधी मानसिकतेचं असल्याचा आरोप केला आहे. त्या फक्त मतांसाठी तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचे म्हटले आहे. ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध भाजपने जोरदार मोहिम सुरू केली आहे. सरकार हे मुस्लिमांचे मतांसाठी लांगूनलाचन करते असा भाजपचा आरोप आहे. भाजपच्या अनेक कर्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे असा आरोपही नड्डा यांनी केला आहे.