‘या’ राज्यात शैक्षणिक संस्था 20 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश !

कोलकता : वृत्तंसंस्था –   संपूर्ण जगभरात थैमान माजवणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत तर देशातील सर्व शाळा महाविद्यालये अद्यापही बंदच आहेत. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना पश्चिम बंगाल सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शैक्षणिक संस्था 20 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना संकटामुळे मागील अनेक महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्था बंद आहेत. कोरोनाचा कहर अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाहीये. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल सरकारने 20 सप्टेंबर पर्यंत शाळा, माहाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने राज्यात संपूर्ण लॉकडाऊनच्या ताज्या तारखा जाहिर केल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारने सध्या सप्टेंबर महिन्यात तीन तारखांची घोषणा केली आहे. या दिवशी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन असेल. राज्यात 7,11 आणि 12 डिसेंबर रोजी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.