हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ इंदापूरात उद्या मुख्यमंत्र्यांची सभा

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) – इंदापूर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय (आठवले गट) रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचे इंदापूर येथे गुरुवारी (दि. 17)  रोजी दुपारी 1.30 वा. आयोजन करण्यात आले असल्याची माहीती इंदापूर विधानसभा महायुतीचे प्रचार प्रमुख अॅड. कृष्णाजी यादव यांनी इंदापूर येथे दिली.

इंदापूर येथील नवीन प्रशासकीय इमारती शेजारील भव्य पटांगणावर सदरची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याने महायुतीचे तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण निर्माण झालेले आहे. महायुतीचे इंदापूर तालुक्यातील नेते व  कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांची सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागले असुन  सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रचारप्रमुख अॅड.कृष्णाजी यादव यांनी केले आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी