Coronavirus : नोटांवर थुंकणार्‍या विकृतांवर मुख्यमंत्री ठाकरे संतापले, दिला ‘गंभीर’ इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाबाधित व्याक्तींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त व्यक्तींची संख्या जास्त आहे, जी चिंतेची बाब आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. आज पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील नियम पाळणाऱ्या आणि सायंम राखणाऱ्या जनतेचे आभार मानले. हाच संयम काही काळ असाच राखण्याचे देखील आवाहन केले.

एकीला गालबोट लावू देणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजात दुही माजवणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘समाजात काही विकृत व्हायरस आहेत. काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जर कोणी असे मजा म्हणून जरी करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. समाजात दुही माजवणाऱ्यांना माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. माझ्या राज्यातल्या एकीला गालबोट लावू देणार नाही असा कडक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दिल्लीवरून आलेल्या १०० टक्के लोकांचा शोध लावला
‘मरकजवरून राज्यात आलेल्या सर्वांचा १०० टक्के शोध लावला आहे. ते सर्वजण विलगीकरण कक्षात आहेत. पण अजूनही कोणी बाहेर फिरत असेल तर सर्वांनीच जबाबदारी घेऊन असा कोणी आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यायला हवी. काही मुल्ला, मौलवीही माझ्या संपर्कात… त्यांच्याशी बोलून सूचना दिल्या आहेत,’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

सोलापूरच्या चिमुकलीचे कौतुक
सोलापुरातील ७ वर्षीय आराध्या या मुलीचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आज या आराध्याचा वाढदिवस आहे. तिला मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, हे वय हट्ट करण्याचे आहे, पण तिने वेगळा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. तिने तिच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री निधीसाठी सहाय्यता केली आहे. इतक्या लहान वयात तिचे हे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.

51 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले
महाराष्ट्रात कोविड -१९ ची पॉझिटिव्ह एकूण संख्या ४९० – ५०० च्या आसपास आहे. त्यापैकी ५१ जण बरे झाले आहेत. पण काही जणांचे मृत्यू देखील झाले आहेत. ते मृत्य अशांचे झाले आहेत ज्यांचं वय जास्त आहे,तसेच त्यांना इतर आजार आधीआपसुनच आहेत. त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. घरातील वृद्ध व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे 

– माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं मी रक्षण करणारच

– 51 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

– पुढील सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय किंवा धार्मिक उत्सव होणार नाही

– सर्वांनी आपला सण, उत्सव घरात साजरा करावा

– सर्व पक्षाचे नेते तसंच सर्व धर्माचे धर्मगुरू माझ्या संपर्कात

– इतर राज्यातील मजुरांचीही जे इथं अडकलेत त्यांची आपण जबाबदारी घेतली आहे

– परराज्यातील मजुरांनी सैरभैर होऊ नये

– हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे…आपण लढणार आणि जिंकणार

– माझा माझ्यापेक्षाही तुमच्यावर विश्वास…

– घऱाबाहेर पडताना स्वच्छ रुमाल तोंडाला बांधून बाहेर पडा

– भाजी मार्केट 24 तास खुली असतानाही गर्दी का करताय?

– माझे वडील बाळासाहेब ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही, आज आत्मविश्वासाची गरज आहे

– कोरोना आपली परीक्षा बघतोय, त्याच्यासमोर गुडघे टेकता कामा नये

– लढायला आम्ही मागे पुढे पाहात नाही

You might also like