मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेला संबोधित करणार, पॅकेजची घोषणा होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 जाहीर केला असून तो 30 जून पर्यंत असणार आहे. लॉकडाऊनमध्ये कोणत्या प्रकारची सूट देण्यात येईल हे केंद्र सरकारकडून शनिवारी जाहीर करण्यात आलं. त्यानंतर आज (रविवार) राज्य सरकारनं लॉकडाऊन 5.0 बाबत नियमावली जाहीर केली आणि लॉकडाऊन 5.0 हा 3 टप्प्यात असेल असं जाहीर केलं. 


त्यानंतर आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज रात्री साडे आठ वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री राज्यातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करू शकतात अशी चर्चा आहे. यापुर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी पॅकेजसंदर्भात सूतोवाच केलं होतं तर राज्याचे उपमुख्यमत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दोनच दिवसांपुर्वी राज्यातील जनतेसाठी पॅकेज जाहीर लवकरच करण्यात येईल असं म्हणाले होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज काय घोषणा करणार की आणखी काय माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे पॅकेजची घोषणा करू शकतात अशीच देखील चर्चा आहे. मुख्यमंत्री नेमकी काय घोषणा करणार हे रात्री साडे आठ वाजता समजणार आहे. दरम्यान, राज्य सरकारनं 3 जून, 5 जून आणि 8 जून पासून काय चालू होणार आणि 30 जून पर्यंत अथवा पुढील आदेश येईपर्यंत काय बंद असेल हे नियमावलीमध्ये स्पष्ट केलेले आहे.