CM Thackeray and Ajit Pawar । उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग नाही आवडला’, मुख्यमंत्री म्हणाले, ‘रंग बदलण्याचं धाडस सरकारमध्ये’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील मल्हार पेठ पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या इमारतीचा ई-भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. यावेळी इमारतीच्या रंगावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावरून मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया देत विरोधकांना टोला लगावला आहे. ‘रंग बदलण्याचं धाडस या सरकारमध्ये आहे. “अजित पवार इमारतीच्या रंगाबद्दल बोलले. मला बरं वाटलं, मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे. जे समोर दिसत. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात, असं मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमा दरम्यान बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray) व्हावेत, त्यांच्या हस्ते इमारतींचं उद्घाटन व्हावं आणि मला कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून उपस्थित राहता यावं, असंच नियतीच्या मनात असावं. त्यामुळे पोलीस ठाण्याचं काम इतकं लांबलं आहे. ‘देर आये दुरूस्त आये. चांगल्या कामाची सुरूवात होतेय ही आनंदाची बाब आहे. ही कामं दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

तसेच पुढे पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘ प्रेझेटेशनमध्ये इमारतीचा आणि पोलीस ठाण्याचा रंग मला आवडलेला नाही.
पिवळा पट्टा आणि निळा पट्टा. ते एकदम बेकार दिसतं.
काम पूर्ण होईल त्यावेळस चांगल्या पद्धतीने रंग त्याला देऊ.
चांगला रंग देऊन इमारत उठावदार करता येते. त्या गोष्टीचा विचार सर्वानी करावा. महाराष्ट्र पोलीस दलाला शौर्याची परंपरा आहे. पोलिसांनी स्वतःला तंदुरुस्त ठेवली पाहिजे. वरिष्ठांनी कनिष्ठ कर्मचाऱ्यांची काळजी प्राधान्यानं घ्यायला हवी. राज्यातील पोलीस वसाहतींची अवस्था चांगली नाहीत. पण चांगली घरं देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असणार असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, ‘अजित पवार (Ajit Pawar) इमारतीच्या रंगाबद्दल बोलले.
मला बरं वाटलं, मला असं वाटलं होतं की, मी एकटाच कलाकार आहे. हल्ली माझी कला, फोटोग्राफी, चित्रकला बासनात गुंडाळली गेली आहे.
जे समोर दिसत. ते बघावं लागतं. अनेकजण अनेक रंग दाखवताहेत, ते रंग बघावे लागतात.
पण, हे रंग बदलण्यासाठी धाडस असावं लागतं. ते धाडस या सरकारमध्ये आहे.
लोक रंग दाखवताहेत, ते आपण बघतो, त्याला काही अर्थ नाही.
पण, एखादा रंग नाही, आवडला, तर ते बदलण्याचं धाडस सरकारमध्ये असल्याचं मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel : cm uddhav thackeray ajit pawar police station construction

हे देखील वाचा

COVID-19 vaccine tips | सर्दी, खोकला, तापासारख्या कोरोनाच्या लक्षणांनी पीडित लोक लस घेऊ शकतात का?

सचिन वाझेच्या पुनर्नियुक्तीशी अनिल देशमुखांचा थेट संबंध नाही; उच्च न्यायालयात युक्तिवाद

Panchavati Express | खूशखबर ! मुंबई- नाशिक धावणारी ‘पंचवटी’ अन् ‘जनशताब्दी’ एक्स्प्रेस उद्यापासून पुन्हा प्रवाशांच्या सेवेत

Bank Holidays in July 2021 । जुलैमध्ये एकूण 15 दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या सुट्टयांची यादी