मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे दिल्ली जाणार, पंतप्रधान मोदींची घेणार भेट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रमुख मंत्री मंगळवारी (दि.8) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना दिल्लीत (Delhi) भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षण कायदा (Maratha Reservation Act) रद्द केल्यापासून हा मुद्दा चर्चेत आला आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) रद्द झाल्यानंतर राज्यात मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यापूर्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या भेटीदरम्यान मराठा आरक्षणावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला (PMO) विनंती केली होती.
पंतप्रधान कार्यालयाने उद्धव ठाकरे यांची विनंती मान्य केली आहे.
त्यांना उद्या (मंगळवार) भेटीची वेळ दिली आहे.
त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मराठा आरक्षणावर चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उद्या मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे.
या भेटीत केंद्र सरकारने काय केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो,
यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
तसेच घटनादुरुस्ती आणि मागासवर्ग आयोगाच्या अनुषंगानेही या भेटीत चर्चा केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
या भेटीत मराठा आरक्षणाचा मार्ग निघण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे संपूर्ण मराठा समाजाचे या भेटीकडे लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलीच भेट
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर नवी दिल्लीत ही पहिलीच भेट (First visit) असणार आहे. दीड वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस (Congress) यांच्यासोबत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) स्थापन केली. राज्यात भाजपला (BJP) दूर करुन महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपला विरोधी बाकावर बसावे लागले.

Also Read This : 

 

महामार्ग पोलिसांना भिती वाटतेय ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या ‘ट्रॅप’ची; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून ‘अ‍ॅलर्ट’

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय

 

Pakistan Train Accident : पाकिस्तानमध्ये दोन ट्रेनच्या धडकेने मोठी दुर्घटना; 33 लोकांचा मृत्यू, 50 जखमी (व्हिडीओ)

 

जाणून घ्या उन्हाळ्यात होणार्‍या ‘या’ त्रासावरील रामबाण उपाय