MPSC पूर्व परीक्षांबाबत CM उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्यावर्षी दिवाळीच्या वेळी MPSC परीक्षांची तारीख पुढे ढकलली होती. त्यावेळी मी सांगितले होते की यापुढे परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नाही. आताची 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र ही तारीख 8 दिवसांच्या कालावधीतील असले, येत्या आठवडाभरात ही परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ही घोषणा केली.

आता MPSC ची पूर्व परीक्षेची तारीख 12 मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. MPSC ची परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्याच्या वृत्तानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. पुण्यात झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. त्यांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आठ दिवसात परीक्षा घेणार असल्याची घोषणा करुन विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे. MPSC ची पूर्वपरीक्षा अनेकदा पुढे ढकलल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वयोमर्यादा उलटून जाण्याची भीती आहे. अशा विद्यार्थ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. कारण परीक्षा देताना
विद्यार्थ्यांना वयोमर्यादा आडवी येणार नाही, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना आणखी एक दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे

– उद्या तारीख जाहीर करणार, पुढील 8 दिवसांच्या परीक्षा होणार
– MPSC परीक्षा काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेली आहे.
– MPSC हा विषय देखील कोरोनाशी संबंधीत आहे.
– जो कर्मचारी वर्ग MPSC परीक्षेला देण्यात येणार आहे तो सध्या कोरोना मोहिमेच्या कामात व्यस्त आहे.
– या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड प्रतिबंधक लसही द्यावी लागणार आहे. त्या सर्वांची तपासणी करणे आवश्यक आहे.
– दुसरी लाट ही पहिल्या लाटेहून अधिक घातक आहे. त्यामुळे अशी वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी नियम पाळा
– कोणी भडकवत असेल तर भडकू नका, मुख्यमंत्र्यांचे MPSC विद्यार्थ्यांना आवाहन
– यावरुन कोणीही राजकारण करु नय