CM Uddhav Thackeray | ‘महिलांनो, तुमच्याकडं कोणी वाईट नजरेनं पाहिलं, तर त्याला धडा शिकवा’ !

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे, मला कोणाचीही गरज नाही, असा आत्मविश्वास बाळगला पाहिजे. कोणी तुमच्यावर वाईट नजर टाकली तर त्याला धडा शिकवला पाहिजे. तुमचे अनुकरण संपूर्ण देशाने केले पाहिजे. महाराष्ट्र पोलिस (Maharashtra Police) सदैव तुमच्या पाठीशी राहतील. असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. ‘महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले असल्याचं देखील मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले. त्यावेळी ते साताऱ्यातील अलंकार हॉलमध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या (Women Safety Project) ऑनलाइन कार्यक्रमात बोलत होते.

CM uddhav thackeray appeal to women in an online program in satara  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बोलताना म्हणाले, ‘पोलिसाबद्दल तळमळ, आपुलकी, आस्था आहे. पोलिस अठरा तास काम करतात. ऊन, वारा व पावसाची तमा न बाळगता जनतेचे रक्षण करतात. मागील दीड वर्ष कोरोनाशी (Coronavirus) आपण लढत आहोत. या लढाईत अनेक पोलिस बाधित झाले. काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्र पोलिस जनतेच्या संरक्षणासाठी काम करीत आहे. सातारा पोलिस दलाने (Satara Police Force) महिला सुरक्षा पथदर्शी (Women safety guide) प्रकल्पास विविध समाज माध्यमांचा वापर करून आधुनिकतेशी सांगड घातली आहे, असं देखील मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, ‘पोलिस
विभागातील ज्या महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ज्युडो कराटे येतात. अशा कर्मचाऱ्यांकडून शाळा,
महाविद्यालयातील मुलींना स्वत:ची सुरक्षा कशी करता येईल, यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शाळा व
महाविद्यालये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन सुरू आहेत. महिला सुरक्षा पथदर्शी (Women safety guide) प्रकल्पामुळे छेडछाडी, अपवृत्तींना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच, अपप्रवृत्तींना धाक बसणार असून, गुन्ह्यांचेही प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमावेळी गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलिस महासंचालक संजय पांडे, विशेष पोलिस महासंचालक (महिला व बाल) राज वर्धन, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम, महिला व बाल कल्याण सभापती सोनाली पोळ आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Pimpri Crime | 1.5 कोटींची फसवणूक ! ‘पुणे पिपल्स’चा सेवानिवृत्त बँक मॅनेजर महेश केकंरे, विनोदकुमार जैन-पाटणी, प्रकाश गुजर, स्वप्नील राक्षेवर FIR दाखल

Jumping Rope Benefits | दररोज 30 मिनिटे दोरी उड्या मारा, शरीराला आश्चर्यकारक फायदे मिळतील; जाणून घ्या होणारे लाभ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : CM uddhav thackeray appeal to women in an online program in satara  

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update