औरंगाबादराजकीय

CM Uddhav Thackeray | औरंगाबाद पाणीप्रश्नावरून CM उद्धव ठाकरेंचे अधिकाऱ्यांना कडक निर्देश; म्हणाले – ‘मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | औरंगाबाद शहरातील (Aurangabad) पाणी पुरवठ्याच्या विषयावरून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर शब्दात निर्देश दिले आहेत. ‘मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा.’ कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे.’ अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

 

त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, “औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल.”

पुढे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत,
ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास, विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा,’ इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, शहरातील नवीन योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागणार आहे.
त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी (Divisional Commissioners) स्वत: लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे,” असं देखील ते म्हणाले.

 

भाजपने काढला होता मोर्चा –
काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात औरंगाबाद शहरात पाणी प्रश्नावरून भव्य मोर्चा देखील काढण्यात आला होता.
औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर यावरून जोरदार टीका केली जात आहे.
त्याचबरोबर आता 8 जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला सभा होणार आहे.
त्याआधी त्यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | aurangabad water question do not give me reasons find a way out immediately chief ministers strict instructions to divisional commissioners

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button