CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; ‘हे’ आहे कारण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | राज्याच्या राजकारणात एक नवं वळण लागलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शिंदे गट अधिक मजबूत तयार होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी कालच बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. त्यानतंर वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून मातोश्रीला रवाना झाले.

 

वर्षा ते मातोश्री म्हणजेच मलबार हिल ते वांद्रे कलानगर या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाथ शिवसैनिकांनी घोषणा दिल्या. या प्रवासादरम्यान विविध ठिकाणी शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मातोश्रीला पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं एकच जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यादरम्यान भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह (Tejinder Pal Singh) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

 

सिंह यांनी ऑनलाईन तक्रार करत म्हटलं आहे की, “मुख्यमंत्र्यांनी कोरोना (Corona) झाल्यानंतरही त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या.
उद्धव ठाकरे यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी”,
अशी मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत जनतेला भेटल्याचं सांगत तक्रार दिली आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात मलबार हिल पोलिसांमध्ये ऑनलाईन तक्रार देण्यात आली आहे. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | bjp Tejinder Pal Singh file compaint against cm uddhav thackeray due to he violation of corona rules

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

 

Ramdas Athawale | ‘…म्हणून अजित पवारांसारखं एकनाथ शिंदेंचं बंड फसणार नाही’; रामदास आठवलेंनी स्पष्टच सांगितलं

 

Eknath Shinde | भाजपकडून शिंदे गटाला मोठी ऑफर; एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री?