CM Uddhav Thackeray | ‘लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करावा यासाठी केंद्र सरकारकडून इंधन दरवाढ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर (Modi government) पुन्हा एकादा तोफ डागली. इंधन दरवाढीच्या विषयावरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पेट्रोल, डिझेलचे (Petrol, diesel) दरवाढ आपल्या भल्यासाठीच होत आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला लगावला आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवालाचं लोकार्पण केलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरतोय हे केंद्राच्याही लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. आपण टीका करतो की पेट्रोल एवढं वाढलं, डिझेलचे भाव तेवढे झाले. तसं नाहीये. हे आपल्या भल्यासाठीच होतंय, असा चिमटा काढतानाच मी काही बोललो तर टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो असं म्हणता. पण मी खरं की खोटं बोलतो हे तुम्ही सांगा. असं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, इंधन परवडेनासं झालं तर तुम्ही म्हणतात तसं प्रवासी तुमच्या बाजूने येतील की नाही?
म्हणून चांगल्या हेतूने सरकार इंधन दरवाढ होत आहे. पण आपण लक्षातच घेत नाही,
असा टोला देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | central government raises fuel prices for people to travel on public transport said uddhav thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Corporation | गणेश बिडकर यांचा जगताप यांच्यावर ‘हल्लाबोल’; सभागृह नेते म्हणाले – ‘प्रशांत जगताप यांना तुरूंगाची हवा खावून आलेल्या नेत्यांकडून कोणता सत्संग घडतो’ (व्हिडीओ)

BMC Recruitment 2021 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी भरती; 1 लाख 25 हजार रुपये मिळणार पगार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी