CM Uddhav Thackeray | MIM युतीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टचं सांगितलं, म्हणाले – ‘एमआयएम सोबत युती…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – एमआयएमने (MIM) काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) आघाडीची ऑफर दिली आहे. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) येणार का ? याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान आता एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याच्या दिलेल्या प्रस्तावावरून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एमआयएम सोबत युती (Alliance) होणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

 

सध्या आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरु असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे हिंदुत्व (Shivsena Hindutva) महाराष्ट्रभर (Maharashtra) पोहोचवा, एमआयएमचा कट उधळून लावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी खासदारांना दिले आहेत.

 

मेहबुबा मुफ्ती यांच्यावरुन भाजपला टोला
एक वेळ अशी होती की मेहबुबा मुफ्तीसोबत (Mehbooba Mufti) संसार करत होते. आता ते आपल्याला बोलत आहेत. आपल्याला अनेक ऑफर येत आहेत. पण आपण महाविकास आघाडी म्हणून एक आहोत. महाविकास आघाडीचा धर्म आपल्याला पाळायचा आहे. या आधी काही जणांनी घात केल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

एमआयएम भाजपची बी टीम
भाजपवर (BJP) टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले, एमआयएम भाजपची बी टीम (B Team) आहे.
एमआयएमसोबत युती होणार नाही. विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिले पाहिजे.
विरोधकांची हवा पहिल्या पेक्षा कमी झाली आहे. लोकांनाही विरोधकांचे डावपेच लक्षात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | chief minister uddhav thackeray reacted to mim proposal to join maha vikas aghadi

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा