CM Uddhav Thackeray | दीड महिन्यात ‘कोरोना’ रुग्णांमध्ये 7 पटीने वाढ; मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, मोठा निर्णय घेत केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दोन वर्षानंतर राज्यातील कोरोनाचा संसर्ग (Corona Infection) नियंत्रणात आला होता. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज टास्क फोर्सची (Task Force) बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये कोरोनाच्या सद्यस्थिती बाबत चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करत जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. निर्बंध (Restrictions) नको असतील स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण (Vaccination) करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या (Covid Task Force Committee) सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Chief Secretary Manukumar Srivastava), मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे (Principal Advisor Sitaram Kunte), सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास (Dr. Pradeep Vyas), मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव (Additional Chief Secretary) आशिष कुमार सिंह (Ashish Kumar Singh) आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे.

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा
कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये (Field Hospitals) व्यवस्थित आहे का पाहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) करुन घ्यावे. या ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला (Health Department) दिल्या. कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट (New Variant) आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक (Dr. Sanjay Oak), डॉ. अजित देसाई (Dr. Ajit Desai), डॉ. बजान (Dr. Bajan), डॉ. शशांक जोशी (Dr. Shashank Joshi), डॉ. राहुल पंडित (Dr. Rahul Pandit), डॉ. वसंत नागवेकर (Dr. Vasant Nagvekar), डॉ. तात्याराव लहाने (Dr. Tatyarao Lahane) यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे आपली मते मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

– ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तात्काळ कोविड चाचणी करुन घ्या

– गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा

– बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

– ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी

– आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी

– ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | chief minister uddhav thackeray takes serious note of growing corona patients in the state takes big decision appeals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या विरोधात FIR

 

Restaurant Service Charges | रेस्टॉरंटमध्ये खाणार्‍यांसाठी खुशखबर, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे स्वस्त झाले लंच-डिनर

 

ACB Trap On PSI Yogesh Dhikale | 1 लाखाची लाच घेताना फौजदार अँटी करप्शनच्या जाळ्यात