CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांची भाजपवर घणाघाती टीका, ‘बाबरी पाडत होतो तेव्हा तुम्ही…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Government) आल्यापासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जळजळीत टीका केली आहे. बाबरी पाडत (Babri Masjid Demolition) होतो तेव्हा तुम्ही बिळात बसलेलात अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी टीका केली आहे. तसेच राम मंदिर बांधण्याचा (Ram Mandir Ayodhya) निर्णय तुम्ही घेतला नसल्याची देखील टीका केली. ते बेस्टच्या मोबिलिटी कार्डच्या (Mobility Card) लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

 

लोकार्पण सोहळ्यावेळी बेस्टच्या पुढे चला असे घोषवाक्य बोलता बोलता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पुढे-पुढे करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.
हिंदुत्त्वाच्या (Hindutva) मुद्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मला देवळात बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना धडकी भरवणारा हिंदू हवाय,
असे म्हणत आम्हाला घंटाधारी हिंदुत्व नको, गदाधारी हिंदुत्त्व हवं आहे, असे म्हणत भाजपला चिमटा काढला.

 

राणा दाम्पत्याने (Rana Couple) मातोश्रीवर (Matoshree) येऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचा इशारा दिला होता.
यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, भीम रुपी महारुद्रा अंगावर आला तर दाखवणार असा इशारा दिला. तसेच दादागिरी करुन याल तर मान मोडून काढू.
दादागिरी कशी मोडायची हे बाळासाहेबांनी शिकवलंय असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | CM Uddhav Thackeray criticism on bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chandrakant Patil On Thackeray Government | चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा; म्हणाले – ‘लाथ मारायची आणि साॅरी म्हणायचं…’

 

Sharad Pawar On Amruta Fadnavis | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेवरून पवारांनी अमृता फडणवीसांना फटकारलं; म्हणाले…

 

Pune Crime | धायरीत गुंडांच्या टोळक्याचा हैदोस, तरुणांना कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; मोटारीच्या काचा फोडून पसरविली दहशत

 

Pune Crime | IPL सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या परेश भूत, प्रफुल्ल कलावटे, अक्षय ठोंबरे आणि महेश क्षिरसागरला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक