CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; ‘जे गेलेत त्यांचा विचार करू नका….’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | शिवसेनेचे बंडखोर नेते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रात भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करणार असल्याचे संकेत गुरुवारी दिले. त्यामुळे येत्या एक दोन दिवसात राज्यात भाजप – शिंदे युती सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्ष बांधणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी मुंबईतील सर्व विभागप्रमुखांची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी ‘जे गेलेत त्यांचा विचार करू नका कामाला लागा,’ असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, “जे गेलेत त्यांचा विचार करू नका, आपण हिंदुत्त्व आणि मराठीच्या मुद्द्यावर आजही कायम आहोत. विभागवार मेळावे लावा, शाखा पिंजून काढा असे आदेश देतानाच पक्षबांधणीसाठी सर्व कार्यकर्त्याना जोर लावून काम करावं लागेल,” असंही त्यांनी सांगितले.

 

शिवसेनेने एकनाथ शिंदेंसह 12 सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्याकडे केली आहे. तसे पत्र शिवसेनेने दिले. त्यामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde), तानाजी सावंत (Tanaji Sawant), प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar), बालाजी किणीकर (Balaji Kinikar), अनिल बाबर (Anil Babar), लता सोनवणे (Lata Sonawane), यामिनी जाधव (Yamini Jadhav), संजय शिरसाठ (Sanjay Shirsath), संदीपान भुमरे (Sandipan Bhumare), महेश शिंदे (Mahesh Shinde), भरत गोगावले (Bharat Gogavale) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी आहे. शिवसेनेने एक बैठक बोलावली होती. मात्र हे सदस्य उपस्थित राहिले नाही. त्या कारणाने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करण्यात आली आहे.

 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ?

राज्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. येत्या एक दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांची यादी व पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे देतील. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असे नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले आमदार –

1. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
2. अजय चौधरी (Ajay Chaudhary)
3. रमेश कोरगावकर (Ramesh Korgaonkar)
4. उदय सामंत (Uday Samant)
5. वैभव नाईक (Vaibhav Naik)
6. रवींद्र वायकर (Ravindra Waikar)
7. उदयसिंह राजपूत (Uday Singh Rajput)
8. संतोष बांगर (Santosh Bangar)
9. भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
10. सुनील राऊत (Sunil Raut)
11. राजन साळवी (Rajan Salvi)
12. दिलीप लांडे (Dilip Lande)
13. नितीन देशमुख (Nitin Deshmukh)
14. कैलास पाटील (Kailas Patil)
15. राहुल पाटील (Rahul Patil)
16. सुनील प्रभू (Sunil Prabhu)
17. प्रकाश फातर्पेकर (Prakash Fatarpekar)
18. संजय पोतनीस (Sanjay Potnis)

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray has called a meeting of shiv sena office bearers and ordered them to start party building work

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा