CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल; म्हणाले – ‘हिंदुत्वाबद्दल जो बोलतो तो त्यांचा शत्रू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – CM Uddhav Thackeray | शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शिवसेनेला (Shivsena) एक मोठा धक्का बसला आहे. यासंदर्भात शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नगरसेवकांशी ऑनलाइनद्वारे संवाद साधला. यावेळी उद्वव ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत आक्रमक पवित्रा घेत भाजपवरही (BJP) हल्लाबोल केला आहे.

 

उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, “शिवसेना ही कुटुंबाची खासगी मालमत्ता नाहीये, शिवसेना हा एक विचार आहे. हा विचार भाजपा संपवायला निघाला आहे. त्यांचा हा डाव आहे. हिंदुत्वाच्या व्होट बँकेत त्यांना दुसरा भागीदार नको आहे. जो-जो हिंदुत्वाबाबत बोलेलं तो त्यांचा शत्रू आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात भाजपा-शिवसेनेला काहीच नव्हते, हिंदू म्हणून लोक एकमेकांना जवळ करायला तयार नव्हतं. तेव्हा हिंदू मतांची विभागणी होऊ नये, म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी भाजपाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. आज त्या युतीची फळं आपल्याला चाखायला मिळतायत, हे आपलं भाग्य आहे.”

 

“शिवसेनेसोबत कुणीच राहिलं नाही, असं चित्र रंगवलं जातंय. पण तुम्हाला पाहून आनंद झाला. मी आता तुमच्या साथीनं महाराष्ट्रभर सभा घेणार आहे. मी आधीच म्हटलं होतं, शिवसेना ही मर्दाची सेना आहे. आपल्यावर जेव्हा- जेव्हा कठीण प्रसंग आले. त्यावेळी ज्यांनी आपल्याला आव्हान दिलं. त्या सर्व पोकळ आव्हानवीरांना आपण राजकारणात संपवून पुढे गेलो आहोत. शिवसेनेच्या वर्धापनदिनी मी सांगितलं होतं की, आज परत सांगतो, शिवसेनेत गद्दारांची अवलाद नको. पण ती पुन्हा एकदा समोर आलीय,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी केली म्हणून भाजपाचे लोक हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारत आहेत.
पण त्यांनी काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत सरकार स्थापन केलं होतं.
सत्तेसाठी त्यांनी काहीही केलेलं चालतं का?” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray on bjp hindutva vote bank and
eknath shinde online meeting with corporators

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा