CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा परमबीर सिंग यांच्यावर निशाणा, म्हणाले -‘आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरु आहे’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी लेटर बॉम्ब टाकत 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला. याच प्रकरणात अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांच्या घरावर ईडी (ED), सीबीआय (CBI), इन्कम टॅक्सकडून (Income tax) धाडसत्र सुरु आहे. मात्र, असे असताना तक्रारदार परमबीर सिंह हेच गायब आहेत. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सिंग यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) विस्तारित इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरु आहे, अशा शब्दांत त्यांनी परबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला.

तक्रारदारच पळून गेला

आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीपण केस सुरु आहे. तक्रारदार गायब (complainant missing)… आरोप करुन पळून गेला, कुठे गेला कोणाला माहिती नाही. पण आरोप केले आहेत ना मग खणून काढा. खणलं जात आहे. चौकश्या सुरु आहेत. धाडसत्र सुरु आहेत असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी परमबीर सिंग यांच्या नावाचा उल्लेख टाळत टीका केली.

 

आम्हाला न्याय प्रक्रियेवर विश्वास
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयासाठी नवी इमारत पाहिजे आहे. हे माझे स्वप्न आहे. मी आज एक वचन देतो इमारतीचं भूमिपूजनाची तारीख तर ठरवूच आणि प्रयत्न करु की आपल्याच कारकिर्दीत याचे उद्घाटन होईल. आम्हाला न्याय प्रक्रियेबाबत पूर्ण विश्वास आदर आहे. न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आणखी गतीमान होण्यासाठी सरकार म्हणून जे काही करणं शक्य आहे ते आम्ही करणार, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray on param bir singh in aurangabad

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Pune Expressway Accident | ‘तो’ अपघात नव्हे ! 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री नेमकं काय घडलं? पोलीस तपासातुन ‘पर्दाफाश’

National Short Film Festival | 14 व्या ‘प्रतिबिंब’ राष्ट्रीय लघुपट महोत्सवात लोडिंग पिक्चर्स निर्मित ‘डे झीरो’ ठरला प्रथम

Shivsena Vs BJP | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेची भाजपवर सडकून टीका, म्हणाले – ‘तुमचे हिंदुत्व म्हणजे षंढपणाचा कळसच’