CM Uddhav Thackeray | ‘ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला (व्हिडिओ)

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी औरंगाबादमधील (Aurangabad) सभेत भाजपसह विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सभा सुरु होणार म्हणून मी कुणावर तोफ डागणार अशा बातम्या रंगल्या आहेत, पण ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)  यांनी भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, आज जवळपास माझी शस्त्रक्रिया झाल्यानंतर सहा महिन्यांनी मुंबईच्या बाहेर पाऊल टकलं आहे. पहिलं पाऊल हे शिवसेनाप्रमुखांच्या (Shivsena Chief)  आवडत्या संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आलेलो आहे. जिथे जिथे नजर जाते तिथे लोकच लोकं आहेत. आज मराठवाड्यात (Marathwada) शिवसेनेने पहिलं पाऊल टाकलं होतं ती आजची तारीख. ती केव्हाची सभा होती ते मला आठवत नाही. औरंगाबाद महापालिकेची (Aurangabad Municipal Corporation) सभा झाल्यानंतर ती सभा झाली होती. मी व्यासपीठावरुन नाही तर संभाजीनगरच्या कोणत्यातरी गच्छिवरुन सभा पहात होतो. आणि आज एवढी वर्षे झाली तरी मैदान भरलेलं आहे. आजसुद्धा तोच जल्लोष आणि उत्साह आहे.

 

 

अजूनही शिवसैनिकांची झुंड येते
कुठेही काही कमी नाही. अजूनही शिवसैनिकांची झुंड येत आहे. मी आज आपल्या रुपामध्ये तुळजाभवानी (Tulja Bhavani) आईचं दर्शन घेतलं आहे. मी येताना काही काळ हॉटेलमध्ये टीव्हीमधील सभेचे दृश्य बघत होतो. आकाशातून सभा कशी दिसतेय ते बघत होतो. देव आपली सभा कशी बघत असतील ते बघत होतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

शिवसैनिकांची शक्ती वाया घालवायची नाही
मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडणार, मुख्यमंत्री कोणावर निशाणा साधणार? अशा बातम्या सुरु होत्या. शिवसेनाप्रमुख सांगायचे की ढेकणं चिरडायला तोफेची गरज नसते. ही ढेकणं आम्ही असेच चिरडत असतो. त्यासाठी शिवसैनिकांची शक्ती वाया घालवायची नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला.

पंतप्रधानांचा फोटो करचाकुंडीवर लावला
भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे आज भारतावर नामुष्कीची वेळ आली असून तिकडे अरब राष्ट्रांमध्ये (Arab Nations) आपल्या पंतप्रधानांचा (PM) फोटो कचराकुंडीवर लावण्यात आलाय, अशी टीका त्यांनी केली. भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.

 

अन् भारताची नामुष्की झाली
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे प्रवक्ते सध्या वेगळ्याच मुद्यांवर बोलत आहेत. त्यांना काय गरज होती पैगंबर यांच्यावर बोलायची? जसे आपले देव-देवता आपल्यासाठी प्रिय, तसे त्यांचे देव हे त्यांना प्रिय.
कोणत्याही धर्माचा का तिरस्कार करायचा. पण भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांनी पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आणि भारताची नामुष्की झाली.

 

मित्र होते ते हाडवैरी झाले
अडीच वर्षे झाल्यानंतही हे सरकार कोसळत नाही, त्यामुळे विरोधक अस्वस्थ झाल्याची टीका त्यांनी केली.
ते म्हणाले, गेली 25 वर्षे जे मांडीवर बसले होते, ते आता उरावर बसले आहेत. तर ज्यांच्याशी 25 वर्षे लढलो,
त्यांनी मानसन्मान दिला. आता रोज सरकार पडण्याची हे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळेच मी परत येणार अशी वक्तव्य केली जातात.
भाजप सुपारी देऊन भोंगा वाजवते, हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करुन घेते, असा घणाघात त्यांनी भाजपवर केला.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | CM uddhav thackery rally in aurangabad cannons are not needed to crush lids say uddhav thackeray lashes out at bjp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर

 

Maharashtra MLC Elections 2022 | उमेदवारी डावलल्यानंतर विनायक मेटेंचा सवाल; म्हणाले – ‘भाजपने आम्हाला फक्त वापरून घेतलं का?’

 

Pune HSC Students Suicide | पुण्यात 12 वीत नापास झालेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या, आई-वडिलांना बसला मोठा धक्का