CM Uddhav Thackeray | ‘या’ कारणांसाठी CM उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल होणार; 2-3 दिवस तिथेच राहून उपचार घेणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  CM Uddhav Thackeray | मागील अनेक दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पाठीचा त्रास सुरू होता. यामधून बरे झाल्यानंतर आता त्यांना मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांचा त्रास वाढल्याने आज (बुधवारी) त्यांना गिरगावातील रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

आज कॅबिनेट बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना रुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
या बैठकीदरम्यान त्यांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठीचा आणि मानदुखीचा त्रास होत आहे.
सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे.
मात्र, आता त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया (surgery) करण्याची शक्यता आहे.
सुप्रसिद्ध स्पाईन सर्जन शेखर भोजराज (Shekhar Bhojraj) हे शस्रक्रिया करणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

दरम्यान, आज मुख्यमंत्र्यांची तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं आहे.
यामुळे तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे आज याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

Web Title : CM Uddhav Thackeray | cm uddhav thackery will be admitted to the hospital soon

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Price Today | सोन्याचे दर वाढले, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचे नवीन दर

Joint Pain In Winter | थंडीत त्रास देतील सांधे आणि हाडांच्या वेदना, ‘या’ 5 पद्धतीने मिळेल आराम

Lpg Cylinder | ‘या’ नंबरवर मिस्ड कॉल देऊन बुक करा LPG Cylinder, जाणून घ्या कसे करू शकता बुकिंग