उद्धव ठाकरेंच्या हाती स्टिअरिंग ! पुण्याला जाताना मुख्यमंत्र्यांनी चालवली गाडी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – पुण्यातील वाढत्या कोरोनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतून रवाना झाले आहेत. यावेळी त्यांनी स्वत: गाडी चालविली आहे. आदित्य ठाकरे जी गाडी वापरतात ती गाडी घेउन आज मुख्यमंत्री स्वत: चालवत असल्याचे दिसून आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुणे दौर्‍यावर आहेत. मातोश्रीवरून ते रवाना झाले असून बाराच्या सुमारास पुण्यात पोहचणार आहेत. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकार्‍यांसोबत बैठका होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा आढावा आणि त्यासाठी उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई बाहेर पडत आहेत.

 

पुण्यात जाऊन तिथल्या कोरोनाच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा मुंबईला येणार आहे. पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे यासंदर्भात नवीन कोणत्या उपाययोजना करण्यात येईल यावरही चर्चा करण्यात येणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित असणार आहेत. बैठकीत विभगीय आयुक्त तसंच पुणे जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत